Sudhir Mungantiwar Tested Coronavirus Positive: महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला आयसोलेट केल्याची माहिती
अशात विविध पक्षांचे नेते, आमदार, खासदार यांचा जनसंपर्क असल्याने या मंडळींचा कोरोनाचा धोका वाढला आहे. आजच बातमी आली होती की,
महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत. अशात विविध पक्षांचे नेते, आमदार, खासदार यांचा जनसंपर्क असल्याने या मंडळींचा कोरोनाचा धोका वाढला आहे. आजच बातमी आली होती की, राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनतर माहिती मिळत आहे की, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत हे माहिती दिली आहे. मुनगंटीवार हे वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत.
याबाबत माहिती देताना ते म्हणतात. ‘माझा कोरोना विषाणूचा अहवाल सकारात्मक आला आहे, मी स्वत: ला अयसोलेट केले आहे. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी सावधगिरी बाळगण्याची विनंती करत आहे तसेच त्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला आयसोलेट ठेवावे.’
पहा ट्वीट -
याआधी अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय त्यांची पत्नी नयना कडू आणि कुटुंबातील इतर 12 सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कागलचे राष्ट्रवादीचे आमदार आणि ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आणि उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा कोरोना अहवालही शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. (हेही वाचा: राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती)
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आज 21907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23501 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 857933 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 297480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.22% झाले आहे.