Sudhakar Badgujar Expelled From Shiv Sena UBT: सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी
सुधाकर बडगुजर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती पण त्यांचा निर्णय होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून त्यांची हकालपट्टी करत धक्का दिला आहे.
नाशिक (Nashik) मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची हकालपट्टी झाली आहे. पक्षविरोधी कारवाईचं कारण देत बडगुजर यांना पक्षातून काढण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तेव्हापासून सुधाकर बडगुजर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. आज नाशिक मध्ये पत्रकार परिषद सुरू असताना सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या मोबाईल वर बडगुजर यांच्या हकालपट्टीचा निर्णय संजय राऊत यांनी दिला.
बडगुजर यांनी हकालपट्टीच्या कारवाई नंतर प्रतिक्रिया देताना हा निर्णय एकतर्फी असल्याचं म्हटलं आहे. पक्षात नाराजी व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही. पक्षाने जी कारवाी केली आहे, त्याला मी योग्यवेळी उत्तर देतील. असं म्हटलं आहे.
सुधाकर बडगुजर यांनी कालच विलास शिंदे यांच्यासह काही जण पक्षात नाराज असल्याचा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सार्यांचं लक्ष लागलं होतं.
सुधाकर बडगुजर कोण आहेत?
सुधाकर बडगुजर हे नाशिक शिवसेना उबाठा गटाचे महानगर प्रमुख आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय होते. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक होते. आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद होते. तर 2012-15 मध्ये ते विरोधीपक्षनेते होते. सध्या सुधाकर बडगुजर यांच्यावर शिवसेना उपनेते पदाची जबाबदारी होती.
आता सुधाकर बडगुजर यांच्यावरील कारवाई नंतर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या आठ दिवसात त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, असे सूचक वक्तव्य केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

