Bhushan Desai यांच्या Eknath Shinde यांना साथ देण्यावर Subhash Desai यांची पहिली प्रतिक्रिया!
असं म्हटलं आहे.
शिवसेना पक्षामध्ये झालेल्या फूटीनंतर आता महाराष्ट्रात काही घरा-घरांमध्ये नाती उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये विभागली आहेत. रामदास कदम, गजानन कीर्तीकर यांच्यानंतर आज सुभाष देसाई (Subhash Desai) या बाळासाहेबांच्या कटवट शिवसैनिकाच्या घरात बाप-लेक यांच्या राजकीय वाटचालीत फाटाफूट झाल्याचं पहायला मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि 'मातोश्री' चे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचा लेक भूषण देसाई (Bhushan Desai) यांचा मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश झाला आहे. ही घटना उद्धव ठाकरे गटासाठी धक्का मानला आहे. दरम्यान यावर सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया
सुभाष देसाई यांनी एका पत्राद्वारा भूषण देसाई यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिल्याचं लोकसत्ता च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. सुभाष देसाई यांनी पत्रामध्ये 'भूषण देसाई यांचा शिवसेना पक्षप्रवेश आणि एकनाथ शिंदे यांना साथ ही माझ्यासाठी देखील क्लेषदायक घटना आहे. भूषण देसाई याचे राजकारणामध्ये यापूर्वी शिवसेनेमध्ये कोणतेही काम नाही. त्यामुळे त्याच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. दरम्यान माझी उद्धव ठाकरे, त्यांचे कुटुंब आणि 'मातोश्री' यांच्यासोबत असलेली मागील 50 वर्षांपासूनची निष्ठा अढळ राहणार आहे. पक्षाला पुढे न्याय मिळेपर्यंत आणि गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी काम तसेच सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी देखील विधिमंडळ परिसरात भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशाबद्दल प्रतिक्रिया देताना ज्यांना ज्या वॉशिंग़ मशिनमध्ये जायचं आहे तेथे जावं असं म्हणत त्यांचा पूर्वी पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. यावर भूषण यांनीही त्यांच्यासाठी मी अत्यंत लहान माणूस आहे असं म्हणत चर्चा टाळली आहे.
भूषण यांनी आपण वडील सुभाष देसाई यांच्याशी यापूर्वीच या निर्णयाविषयी बोललो होतो असे म्हटलं आहे.