गडचिरोली: नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने आणि जवान किशोर आत्राम यांना वीरमरण; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाहली श्रद्धांजली

गडचिरोली येथे आज सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान भामरागड तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक व्हनमाने (Dhanaji Vhanmane) आणि जवान किशोर आत्राम (Kishor Aatram) शहिद झाले आहेत.

Anil Deshmukh (Photo Credit: Twitter)

एकीकडे  संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना नक्षल्यांच्या हिंसक कारवाया थांबण्याचे नाव घेत नाही. गडचिरोली येथे आज सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान भामरागड तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक व्हनमाने (Dhanaji Vhanmane) आणि जवान किशोर आत्राम (Kishor Aatram) शहिद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने आणि जवान किशोर आत्राम यांना वीरमरण आले आहे, असे म्हणत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

नक्षलविरोधी अभियानांचे सी -60 कमांडो, भामरागड उपविभाचे क्विक रिस्पॉन्स टीमचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या पोयरकोठी-कोपर्शी जंगलात चकमक उडाली. पोलीस याठिकाणी गस्त घालत असताना अचानक नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रतिउत्तरात नक्षल्याचा दिशेने गोळीबार सुरू केला. या चकमकीत गडचिरोली C-60 दलाच्या शीघ्र कृती दलाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाणे आणि पोलीस जवान किशोर आत्राम यांना वीरमरण आले. शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील रहिवासी आहेत. तर, पोलीस जवान किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहे. हे देखील वाचा- Covid-19 Lockdown मध्ये पुणे पोलिस आयुक्तांचे विद्यार्थ्यांना शहर न सोडण्याचे कळकळीचे आवाहन; व्हिडिओ शेअर करत दिला मोलाचा सल्ला (Watch Video)

अनिल देशमुख यांचे ट्वीट-

पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने आणि जवान किशोर आत्राम मृतदेह गडचिरोली मुख्यालयात दाखल झाले आहेत. गडचिरोली पोलीस मुख्यालयात शहिदांना सलामी देण्यात येणार आहे. तसेच या चकमकीत तीन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपुरात नेण्यात आले आहे. याशिवाय राजू पुसाली, गोंगलु ओकसा आणि दासरू कुरसामी हे जवान गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif