Andhra Pradesh Ragging Video: एनसीसी प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
एनसीसी प्रशिक्षणाच्या नावाखाली सिनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्यांना मध्यरात्री बोलावून मारहाण केले आहे.
Andhra Pradesh Ragging Video: आंध्रप्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील नरसा राओपेट येथील एनएसएन कॉलेजमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एनसीसी प्रशिक्षणाच्या नावाखाली सिनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्यांना मध्यरात्री बोलावून मारहाण केले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांना लाठ्या काठ्याने मारत असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा- जीम मालकाची चाकूने भोसकून हत्या, आरोपीला अटक (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, वायएसआर कॉंग्रेस पक्षाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांना लाठा- काठ्यांनी मारहाण करत आहे. एसएसएन कॉलेजमध्ये ही घटना घडली असून एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखील सीनियर विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्यांवर अत्याचार करत आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
कॉलेज प्रशासनाने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांनीही अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नेटकऱ्यांनी टीका केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिस पथक कॉलेजला भेट देऊन चौकशी करणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार आणि व्हिडिओच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.