Mumbai Shocker: मुंबईत कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
शाळेत पेपर लिहत असताना शिक्षकांना तिझ्याजवळ कॉपी सापडली. शिक्षकांनी मुलीच्या आईला शाळेत बोलावले आणि घडलेल्या प्रकार त्यांच्या कानावर घातला. या मुलीला प्रकारामुळे नैराश्य आले होते.
परिक्षेत कॉपी करताना पकडल्यामुळे मुंबईतील एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतील चेंबूर कॅम्प येथील इंदिरा नगर परिसरात 16 वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहात होती. ती इयत्ता नववीत शिकत होती. मुलीची शाळेत परीक्षा सुरू होती. मंगळवारी सदर मुलगी शाळेत पेपर लिहत असताना शिक्षकांना तिझ्याजवळ कॉपी सापडली. शिक्षकांनी मुलीच्या आईला शाळेत बोलावले आणि घडलेल्या प्रकार त्यांच्या कानावर घातला. या प्रकारामुळे नैराश्य आलेल्या मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर तिला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबियांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणाची चेंबूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
चेंबूर पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. मुलीच्या मृत्युमुळे कुटुंबीय सध्या बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. मात्र लवकरच त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात कोणताही घातपात आढळला नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2023 02:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

