Champat Rai Support CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडवणारा अजून अयोध्येत जन्माला यायचा आहे- चंपत राय

ज्यात म्हटले आहे की, किसकी मां ने जीरा खाया जो गंगा का पानी रोक सके..! त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून कोण आढवेल? कोणाच्या आईने इतके दूध पाजून वंश वाढवला आहे की, जो उद्धव ठाकरे यांना अयोध्येपासून दूर ठेवेन.

Champat Rai | (Photo Credits: ANI)

अभिनेत्री कंगना रनौत हिला पाठिंबा देत आखाडा परीषद आणि अनेक संतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना अयोध्येत येण्यास विरोध केला. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (State Shriram Janmabhoomi Teerth) चंपत राय (Champat Rai) हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुढे सरसावले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखण्याइतकी ताकद कोणात आहे. कोणाच्या आईने त्याला इतके दूध पाजले आहे. कसकी मां ने इतना जिरा खाया है... असा थेट सवाल चंपत राय यांनी केला आहे.

कंगना रनौत हिने मुंबईचा उल्लेख असा पाकव्याप्त कश्मीर असा केला. त्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना रनौत असा वाद सुरु झाला. शिवसेना खसदार संजय राऊत आणि कंगणा रनौत यांच्या चांगलेच वाकयुद्ध रंगले. पुढे तर मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम केल्याचे सांगत कंगना रनौत हिचे कार्यालय तोडले. या सर्व प्रकरणावरुन नाराज झालेला अखाडा परिषदेचा आणि साधू संतांचा एक गट कंगना रनौत हिच्या बाजूने पुढे आला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येस येण्यास विरोध दर्शवला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना अयोध्येला येण्यापासून रोखण्यास विरोध करणाऱ्यांना चंपत राय यांनी सडेतोड भूमिकेत सुनावले आहे. चंपत राय यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीत. कोणात इतकी हिंमत नाही की ते उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखतील. कोणाच्या आईने इतके दुध पाजले आहे. 'किसी के मां ने इतना जिरा खाया हैं.. जो उद्धव ठाकरे को अयोध्या आने से रोख सखे' असे उद्गारही चंपत राय यांनी काढले आहेत. कंगना रनौत आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतच वाद कारणाशिवाय वाढवला जात आहे, असेही चंपत राय यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Kangana Ranaut vs BMC: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत केले जाणार नाही, VHP चा निर्णय)

चंपत राय यांनी कारसेवकपुरम येथे बोलताना सांगितले की, राजस्थानमध्ये एक गीत आहे. ज्यात म्हटले आहे की, किसकी मां ने जीरा खाया जो गंगा का पानी रोक सके..! त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून कोण आढवेल? कोणाच्या आईने इतके दूध पाजून वंश वाढवला आहे की, जो उद्धव ठाकरे यांना अयोध्येपासून दूर ठेवेन.