ट्विटरवर राज्य चालत नाही; शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचा नितेश राणे यांना खोचक टोला
परंतु, आता नितेश राणे यांच्या टीकेला माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे. केसरकर यांनी नितेश राणे यांना ट्विटरवर राज्य चालतं, असा गैरसमज करून घेऊ नये, असा खोचक टोला लगावला आहे.
मागील अनेक दिवसांपासून आमदार नितेश राणे शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांवर आपल्या ट्विटर हँडलवरून टीका करत आहेत. परंतु, आता नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या टीकेला माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उत्तर दिले आहे. केसरकर यांनी नितेश राणे यांना ट्विटरवर राज्य चालतं, असा गैरसमज करून घेऊ नये, असा खोचक टोला लगावला आहे. केसरकर सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषेदत बोलत होते.
5 डिसेंबरला नितेश राणे यांनी कोकणातील मंदिरांची कामे रद्द केल्यामुळे ठाकरे सरकारवर टीका केली होती. यावर बोलताना केसरकर म्हणाले की, काही लोकांना वाटते की, बैलगाडी ही मागे बांधलेल्या कोकरूमुळेच चालते. परंतु, हा त्यांचा भ्रम असतो. कोणाच्याही ट्विटमुळे राज्यात निर्णय होत नाहीत, असाही टोला केसरकर यांनी लगावला. (हेही वाचा - मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ मधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा)
दरम्यान, केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावरही टीकेची तोफ डागवली. मातोश्रीने आपला स्वाभिमान सिल्व्हर ओकवर गहाण ठेवला ,असे म्हणणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पहिल्यांदा स्वत:चे आत्मपरीक्षण करावे. ज्यांनी स्वत:चा स्वाभिमान राणेंच्या पायावर गहाण ठेवला, त्यांना मातोश्री व सिल्व्हर ओकवर बोलणे शोभत नाही, असंही केसरकर म्हणाले.