ST Bus Accident in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा घाटात एसटी बस झाली पलटी; 7-8 जण जखमी
66 प्रवासी घेऊन जात असलेली ही बस पलटी झाल्याच्या या अपघातामध्ये बस मधील 6-7 जण जखमी झाल्याची बाब समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar) मध्ये अजिंठा घाटात (Ajintha Ghat) एसटी बसचा भीषण (ST Bus Accident) अपघात झाल्याची एक घटना समोर आली आहे. बसचालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस पलटी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे 66 प्रवासी घेऊन जात असलेली ही बस पलटी झाल्याच्या या अपघातामध्ये बस मधील 6-7 जण जखमी झाल्याची बाब समोर आली आहे. ही बस पुणे ते रावेर असा प्रवास करत असताना हा अपघात झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन मदत कक्षासोबतच स्थानिकांनी देखील धावाधाव केल्यानंतर बसमध्ये अडकलेल्यांना मदत केली. अपघातामधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी अजिंठा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, काही जणांना खासगी रुग्णालयाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बस उलटल्याने आत मध्ये अडकलेल्यांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू होती. नक्की वाचा: Akola Car Accident: शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा .
बस पलटल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे. बसच्या मागच्या पुढल्या काचा फुटल्या आहेत तर टायरही निखळला आहे. या घटनेची आगार प्रमुखांना माहिती देण्यात आली आहे. संबंधित अधिकार्यांनीही घटनास्थळी पोहचून पाहणी केली आहे.