ST Bank News: एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी, गुणरत्न सदावर्ते यांना धक्का
एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील (Saurav Patil) यांची सहकार आयुक्तांनी पदावरुन हकालपट्टी केली आहे. पाटील यांनी पदासाठीचा एकही निकष पूर्ण केला नसल्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील (Saurav Patil) यांची सहकार आयुक्तांनी (commissioner for cooperation and registrar cooperative societies maharashtra) पदावरुन हकालपट्टी केली आहे. पाटील यांनी पदासाठीचा एकही निकष पूर्ण केला नसल्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. पाटील हे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे सहाजिकच या कारवाईमुळे सदावर्ते यांना जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे. संचालक पदावर नेमणूक करताना आरबीआयकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे सहकार विभागाकडून आगोदरच नाराजी व्यक्त केली जात होती. आता थेट कारवाई करुनच पाटील यांना हाकलण्यात आले आहे.
एसटी बँक व्यवस्थापकीय संचालक पदासाठी सर्वसाधारण निकष
- संचालक पदावरील व्यक्तीस सहकार क्षेत्रातील किमान आठ वर्षांचा अनुभव
- सदर व्यक्तीचे वय 35 वर्षे पूर्ण असावे.
- संचालक पदासाठीच्या नेमणुकीसाठी आरबीआयची परवानगी आवश्यक
- यांशावार इतरही काही निकष असतात.
सौरभ पाटील यांच्याकडून कोणताच निकष पूर्ण नाही
दरम्यान, सौरभ पाटील वरीलपैकी कोणताच निकष पूर्ण करत नव्हते. एकतर पाटील यांचे वय अवघे 25 वर्षांच्या आसपास आहे. त्यांच्याकडे सहकार क्षेत्राता पूरेसा अनुभव नाही. शिवाय त्यांना आरबीआयची परवानगीही मिळाली नव्हती. त्यामुळे ते कोणत्याच निकषात बसत नव्हते. परिणामी त्यांना पदावरुन दूर करण्याशिवाय सहकार आयुक्तांकडे कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे आयुक्तांनी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा, Mumbai News: सदावर्तेंची वाहन फोडणाऱ्यां मराठा क्रांतीचे कार्यकर्त्यांचा डोंबिवलीत सत्कार)
नाराजी व्यक्त करत सहकार आयुक्तांचे पत्र
दरम्यान, निकषांवर बोट ठेवत सहकार आयुक्तांनी पत्रही लिहीले होते. त्यांतरया प्रकरणात मोठ्या घटना घडल्या आहेत. सांगितले जात आहे की, या काळात बँकेच्या ठेवीही मोठ्या प्रमाणावर काढण्यात आल्या आहेत. ठेवी काढल्याची रक्कम थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 480 कोटी रुपयांची आहे. या निर्णयाविरुद्ध एसटी बँक संचालक मंडळानेसुद्धा नाराजी व्यक्त केली होती. हे प्रकरण जोरादर वादग्रस्त ठरल्याने या प्रकरणाची चौकशीही सुरु होती. दरम्यान, आयुक्तांनी पाटील यांना हटविण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांच्या पत्रात म्हटले आहे की, पाटील यांना आठवडाभरात पदमुक्त करण्यात यावे. त्यानंतर त्वरीत नव्या संचालकांनी नेमणूक करण्यात यावी, असे म्हटले आहे.
सौरभ पाटील यांच्यावर कारवाईचा बडगा उघारण्यात आलाय. हा गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. गुणरत्त सदावर्ते यांच्या पॅनेलटी एसटी बँकेवर सत्ता आहेत. त्यांचे नातावेईक सौरभ पाटील हे संचालक झाले होते. पण ते कोणत्याही निकषात बसत नव्हते. याआधी सहकार आयुक्तांनी पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता सौरभ पाटील यांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)