Nanded Barad Accident: नांदेडमध्ये अनियंत्रित ट्रकची दुचाकींना धडक, दोन जणांचा मृत्यू

या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना भोकर रस्त्यावरील बारड येथे घडली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Nanded Barad Accident: नांदेडमध्ये एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या ८ दुचाकींना चिरडले आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना भोकर रस्त्यावरील बारड येथे घडली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा-  चांदवडनजीक एसटी बसचा भीषण अपघात, पाचपेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू; अनेक गंभीररित्या जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक भोकरवरून नांदेडच्या दिशेने येत होते. त्यावेळीस अचानक अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना चिरडली. अपघात इतका भीषण होता की, एकाचा जागीच मृत्यू झाला आणि एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतकं नव्हे तर अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघातात ८ दुचाकी भरपूर नुकसान झाले आहेत त्याच सोबत ट्रकचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.

अपघातात गोविंद रामजी कोडेवाड असं जागीच मृत्यू झालेल्या इसमानाचे नाव आहे. ट्रकचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झाली आणि पुढे जाऊन आठ दुचाकींना धडकली. अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघात स्थळावरून परिस्थिती पाहून पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif