Accident On Panvel Highway: पनवेल महामार्गावर भरधाव कारची अवजड वाहनाला धडक; 1 ठार, 2 जखमी

अपघातादरम्यान, तेजस पालांडे कार चालवत होता. तर विकेश तांबे त्यांच्या शेजारी बसला होता. तसेच सुजित खोसे हा मागच्या सीटवर बसला होता. पुढे बसलेल्या तांबे याचा अपघातात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. तथापी, स्थानिकांनी तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना सांगितली.

Accident (PC- File Photo)

Accident On Panvel Highway: गुरुवारी पहाटे पळस्पे (पनवेल) -जेएनपीए महामार्गावर (Panvel Highway) कार अवजड वाहनाला धडकल्याने अपघात (Accident) झाला. या अपघातात नेरूळचा रहिवासी ठार झाला असून त्याचे दोन मित्र जखमी झाले. अपघातानंतर कार पलटी होऊन महामार्गाच्या दुभाजकावर पडली. विकेश तांबे (वय, 32) असे मृताचे नाव आहे. तसेच नेरुळचे रहिवासी तेजस पालांडे (वय, 25) आणि सुजित खोसे (वय, 26) अशी जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, हे तिघेही त्यांच्या कारमध्ये घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पडेघर गावातील कंटेनर फ्रेट स्टेशनसमोर ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे बीट कॉन्स्टेबल राजेंद्र केणी घटनास्थळी पोहोचले. (हेही वाचा - Newly Married Woman Died At Prabalgad Fort: सेल्फीचा मोह पडला महागात! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू)

अपघातादरम्यान, तेजस पालांडे कार चालवत होता. तर विकेश तांबे त्यांच्या शेजारी बसला होता. तसेच सुजित खोसे हा मागच्या सीटवर बसला होता. पुढे बसलेल्या तांबे याचा अपघातात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. तथापी, स्थानिकांनी तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना सांगितली. (हेही वाचा - Bus Overturned Tamhani Ghat: रायगडमधील ताम्हणी घाटात बस उलटून दोन ठार, 55 जखमी)

पनवेल शहर पोलिसांनी पालांडे यांच्यावर बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणे, गंभीर व किरकोळ जखमी करणे, धोकादायक वाहन चालवणे, तसेच मोटार वाहन कायद्यान्वये आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now