महाराष्ट्र: मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी 2 आणि 3 मार्चला अजून एक संधी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची खास मोहिम
याकरिता www.ceo.maharashtra.gov.in वर लॉग ईन करावं लागणार आहे.
Voters Registration Campaign in Maharashtra: येत्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2019) पार पडतील. मतदान करणं हा हक्क प्रत्येक भारतीयाने बजावणं गरजेचे आहे. मात्र समाजामध्ये अजूनही मतदानाबाबत पुरेशी सजगता नाही. मतदारयादीमध्ये नाव नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. मात्र आता निवडणूकांपूर्वीच तुम्हांला विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून दूर राहिलेल्यांना नाव नोंदणीसाठी (voters registration campaign) पुन्हा एक संधी निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 2 आणि 3 मार्च 2019 या दोन दिवसात विशेष मोहिम राबवली जाणार आहे. राज्यातील 557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्च रोजी मतदान; सरपंचपदांच्या 82 रिक्त जागांसाठीही निवडणूक
अधिकाधिक मतदारांना आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवता यावं आणि आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता 23, 24 फेब्रुवारी प्रमाणेच आता या आठवड्यात म्हणजे 2,3 मार्च दिवशी मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन केले जाईल. ग्रामीण भागात मतदार यादीचे चावडी वाचनही होईल. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्याबाबत कळवण्यात आले आहे. मतदार याद्या अधिक अचूक आणि परिपूर्ण बनवण्यासाठी निवडनूक यंत्रणेला सहकार्य करावे यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयाने राजकीय पक्षांनादेखील आवाहन केले आहे.
ऑनलाईन सोय
मतदारांना यंदा ऑफलाईन सोबतच ऑनलाईन स्वरूपातदेखील नाव नोंदणी करता येणार आहे. याकरिता www.ceo.maharashtra.gov.in वर लॉग ईन करावं लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून 1950 हा टोल फ्री क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुमच्या मनातील काही प्रश्नांना, नोंदणीविषयक अधिक माहितीसाठी या क्रमांकावर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मतदानाचा दिवस हा केवळ सुट्टीचा नाही. त्यादिवशी तुम्हांला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता आजच यादीमध्ये नाव आहे की नाही? हे तपासून पहा.