Mumbai Local Mega Block: पुन्हा एका ब्रिज बांधकामासाठी मुंबई लोकलचा जंबो मेगाब्लॉक, जाणून घ्या कधी आणि कुठल्या मार्गावर असेल मेगाब्लॉक

याचा परिणाम कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणार आहे.

Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईची (Mumbai) जिवनवाहीनी असलेल्या मुंबई लोकल (Mumbai Local) बाबत महत्वाची सुचना मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आली आहे. ब्रिज बांधकामासाठी (Mumbai Bridge Construction) मध्य रेल्वेवर (Central Railway Megablock) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईतील (Mumbai) रस्ते वाहतुकीवर रेल्वे वाहतुक आणि रेल्वे वाहतुकीवर रस्ते वाहतुक अवलंबुन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बरेच ठिकाणी रस्ते आणि रेल्वे मार्ग (Railway Route) एकमेकांच्या आजूबाजूने आहेत. नुकताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (Chhatrapati Shivaji Maharaj Terminal) जवळ असलेल्या कर्नाळ पूल (Carnac Bridge) पाडण्यासाठी मध्य रेल्वेकडून जवळजवळ ४८ तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे मुंबई (Mumbai) इतर भागातील ही काही जुने ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी धोक्याचे असल्याने त्यांचे बांधकाम सुरु आहे. किंवा काही पूल, मार्ग नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. याचं प्रमाणे मुंबई उपनगर कल्याण (Kalyan) ते विठ्ठलवाडी (Vitthalwadi) दरम्यान रोड ओव्हर ब्रिज गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. याचा परिणाम कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणार आहे.

 

तरी रोड ओव्हर ब्रिज (Road Over Bridge) गर्डरचं काम बघता मध्य रेल्वे कडून विशेष कालावधीसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक 27 नोव्हेंबर मध्यरात्री 2 वाजून 5 मिनिटांनी सुरु होणार असुन 3 वाजून 35 मिनिटांनी संपणार आहे. तरी मध्य रेल्वेकडून (Central Railway) जाहिर करण्यात आलेला हा मेगाब्लॉक मध्य रेल्वेवरील (Central Railway Mega Block) कल्याण (Kalyan) ते बदलापूर (Badlapur) या स्थानकांदरम्यान अप (Up) आणि डाऊन (Down) या दोन्ही मार्गावर असणार आहे. (हे ही वाचा:- Pune Metro Update: गरवारे ते दिवाणी न्यायालयापर्यंत पुणे मेट्रोची चाचणी यशस्वीपणे पुर्ण)

 

तरी कल्याण बलदापूर (Kalyan-Badlapur) हा मार्ग केवळ लोकल रेल्वे मार्ग नसुन या दरम्यान एक्सप्रेसही (Express) धावत असल्याने लांब पल्याच्या गाडायावर सुध्दा या मेगाब्लॉकचा (Mega Block) परिणाम होणार आहे. दिड तासांच्या या मेगाब्लॉकसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस (Bhubaneshwar Mumbai Konark Express) आणि 18519 विशाखापट्टणम-एलटीटी  एक्स्प्रेस (Bhubaneshwar LTT Express) या गाड्यावर या मेगाब्ल़ॉकचा परिणाम जाणवेल.