कामाठीपुरा येथून 100 पेक्षा अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांची मुंबई पोलिसांकडून सुटका
दक्षिण मुंबईमधील (South Mumbai) देहविक्रीसाठी प्रसिद्ध असलेला कामाठीपुरा (Kamathipura) परिसरातून 100 पेक्षा अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांची सुटका करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईमधील (South Mumbai) देहविक्रीसाठी प्रसिद्ध असलेला कामाठीपुरा (Kamathipura) परिसरातून 100 पेक्षा अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी मध्यरात्रीपासून या ठिकाणी छापेमारी करण्यास सुरुवात केली होती.
तर लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, छापेमारी करण्यात आलेल्या ठिकाणाहून जवळजवळ 6 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच कामाठीपुरा येथे असलेल्या सिम्प्लेक्स इमारतीमध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे.(मुंबई: चर्चगेट दिशेने जाणाऱ्या रेल्वेखाली महिलेची चिमुकल्यासह उडी; महिला ठार, बाळ सुखरुप, जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवरील घटना)
तर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना लवकरच कोर्टात दाखल केले जाणार आहे. त्याचसोबत काही महिला आणि दलालांना या देहविक्री धंद्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.