26/11 Mumbai Terror Attack : 26/11 च्या आठवणींची आजही सोनाली खरेच्या मनात धास्ती !

26/11 मुंबई हल्ल्याच्या रात्री सोनाली तिच्या पतीसोबत मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये डिनरसाठी आले होते.

sonali khare photo credit: Instagram

26/11 Mumbai Terror Attack : मुंबईतील 26/11 हल्ल्याच्या आठवणी आजदेखील मुंबईकरांसाठी तितक्याच ताज्या आहेत. या हल्ल्याची कहाणी केवळ ऐकूनच अंगावर काटा येतो. तर या हल्ल्यातून सुखरूप बचावलेल्यांसाठी हा सारा प्रसंग आणि कटू आठवणी भीतीदायक आहेत. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये अनेकजण कित्येक तास जीव मुठीत धरुन बसले होते. अशापैकी एक म्हणजे अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) .

न्यूज नेटवर्क 18 ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोनाली खरे (Sonali Khare) म्हणाली, " मी आजही ताजमध्ये शिरताना घाबरते. नुकतीच एका लग्नसोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सोनाली ताजमध्ये गेली होती. या वेळेस हॉटेलबाहेर वाजणार्‍या फटाक्यांच्या आवाजानेही घाबरायला होते. असे सोनाली म्हणाली. त्या क्षणीदेखील नवर्‍यासोबत आत जायला मी घाबरत होते. असे सोनाली म्हणाली. 26/11 Mumbai Terror Attack : तीन दिवस चाललेल्या या हल्ल्याचा असा होता घटनाक्रम

सोनाली खरे दहा वर्षांपूर्वी तिच्या पतीसोबत ताज हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले होते. यावेळेस सोनालीची मुलगी अवघ्या 4 महिन्यांची होती. सुरूवातीला गोळ्यांचा आवाज ऐकून हे गॅग़वॉर असावं. असं त्यांना वाटलं होतं. मात्र हळूहळू गंभीर होणारी स्थिती पाहून सार्‍यांनीच जीव मुठीत धरला होता. रात्री उशिरा सोनाली आणि हॉटेलमधील ग्राहकांची सुटका झाली. यामध्ये काही परदेशी पर्यटकदेखील होते.