Satara News: तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा मृत्यू; महाबळेश्वर येथील घटना
सातार जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथे असलेल्या शिवसागर तलावात पोहण्यासाठी तीन मुली गेल्या होत्या.
Satara News: सातार जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथे असलेल्या शिवसागर तलावात पोहण्यासाठी तीन मुली गेल्या होत्या. त्यावेळी दोन मुलींवर काळाने घात केला आहे.तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुदैवाने बुडलेल्या एका मुलीला वाचवण्यात आले आहे. या घटनेमुळे वाळणे गावावर शोककळा पसरली आहे. (हेही वाचा- उत्तर प्रदेशातील देवरिया येथे सिलिंडरचा स्फोट; महिलेसह 3 मुलांचा मृत्यू )
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे गावातील तीन मुली पोहण्यासाठी तलावात गेल्या होत्या. परंतु बराच वेळ झाल्याने त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी चिंता व्यक्त करत तलावापासी शोध घेतला. मुली तलावात बुडल्याचा संशंय आला त्यानंतर गावाकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले. घटनास्थळावरून तिन्ही मुलीला बाहेर काढले परंतु त्यातील दोन मुली बेशुध्द झाल्या होत्या. गावकऱ्यांनी मुलींना रुग्णालयात दाखल केले.
दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एका मुलीवर उपचार सुरु आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली दुपारी ३ वाजता पोहण्यासाठी शिवसागर जलाशय येथे गेले. तलावात पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.सुदैवाने एक मुलगी वाचली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही मुली या अल्पवयीन होत्या.