Sanjay Raut Criticized BJP: टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा - संजय राऊत
अशा लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
Sanjay Raut Criticized BJP: भाजप पक्षातील काही लोक कोणत्याही गोष्टींवर टीका करतात. अशा लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार तोफ डागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. भाजपचे लोक कोणत्याही विषयावर टीका करतात. या लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. यांना लोकं मारायची आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना लोकांचे जीव वाचवायचे आहेत. त्यामुळे त्यांनी संचारबंदी लागू केली. संचारबंदी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही. लोकांचे जीव वाचावेत यासाठी त्यांनी संचारबंदी लागू केली आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावादेखील केला. याशिवाय येत्या काही दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या काळात शिवसेनेत मोठी इनकमिंग होणार असल्याचा दावादेखील यावेळी संजय राऊत यांनी केला. तसेच आमचा एकही आमदार फुटणार नाही, असं विरोधक विश्वासाने सांगत आहेत. मात्र, थोड्या दिवस थांबा आणि पहा काय काय होतं, असं मतही राऊत यांनी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (हेही वाचा - Kolhapur Municipal Election 2021: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; अनेकांचा वाजला राजकीय बँड)
आगामी काळात अनेक राजकीय भूकंप होणार आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू शिवेसेनाभवन असेल, असं स्पष्ट वक्तव्यदेखील यावेळी संजय राऊत यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही महिन्यांपासून परदेशात गेलेचं नाहीत. त्यामुळे परदेशात कोरोनाची विषाणूची काय स्थिती आहे, हे भाजपवाल्यांना कळणार नाही. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी परदेशात काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास करावा. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमधून होणारी विमानसेवा तब्बल 42 देशांनी बंद केली आहे. या देशांनी ही विमानसेवा कशासाठी बंद केली? भाजपला हे समजत का? असा प्रश्नदेखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.