सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक 2019: मोहिते पाटील प्रणित भाजप गटाचा अध्यक्ष पदावर झेंडा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का
अध्यक्षपदाच्या लढतीत अनिरूध्द कांबळे यांना 37 तर, त्रिभुवन धाईंजे यांना 29 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाधान आवताडे गटाची साथ मिळाल्यानं मोहिते पाटील प्रणीत भाजप गटाचे पारडे जड झाले. त्यामुळे महाआघाडीला या निवडणुकीत धक्का बसला.
Solapur Zilla Parishad Chairman, Vice President Election 2019: राज्यात नाट्यपूर्णरित्या सत्तांतर होऊन महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यावर स्थानिक ग्रामपंचात, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसह विविध नगर परिषदांमध्येही राजकारणाची समिकरणं बदलत आहेत. अशा बदलत्या राजकीय समिकरणांच्या वातावरणात सोलापूर जिल्हा परिषद (Solapur Zilla Parishad) अध्यक्ष (President) आणि उपाध्यक्ष (Vice President) पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाच्या माध्यमातून भाजपने अध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. मोहिते-पाटील प्रणित भाजप गटाचे अनिरूध्द कांबळे (Anirudha Kamble) (केम ता. करमाळा ) हे अध्यक्ष पदावर निवडूण आले आहेत. कांबळे यांनी महाविकास आघाडीचे त्रिभुवन धार्इंजे (Tribhuvan Vinayak Dhainje) (वेळापूर, ता़ माळशिरस) यांचा पराभव केला.
अध्यक्षपदाच्या लढतीत अनिरूध्द कांबळे यांना 37 तर, त्रिभुवन धाईंजे यांना 29 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाधान आवताडे गटाची साथ मिळाल्यानं मोहिते पाटील प्रणीत भाजप गटाचे पारडे जड झाले. त्यामुळे महाआघाडीला या निवडणुकीत धक्का बसला. दरम्यान, अध्यक्षपदासाठी निवडणूक सुरु झाली तेव्हा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सदस्यांना व्हिप बजावण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. मात्र, पाटी यांच्या या मागणीला भाजपने जोरदार आक्षेप घेत विरोध केला. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनीही अध्यक्षपद निवडणुकीच्या कायद्यात तशी तरतूद नसल्याचे सांगत काँग्रेसच्या उमेश पाटील यांची विनंती फेटाळून लावली. (हेही वाचा, Maharashtra Nagar Panchayat Election Results 2019: कोल्हापूर-भाजपला धक्का, हातकणंगले- शिवसेनेचे वर्चस्व मात्र नगराध्यक्ष काँग्रेसचा; जाणून घ्या महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणूक निकाल)
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांनी सोलापूर झेडपीमध्ये ताकद लावली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात भाजपने बाजी मारत अध्यक्ष पद आपल्याकडे ठेवत जिल्हा परिषदेवर आला झेंडा फडकावला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)