Solapur Pune Highway Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच ठार, सहा गंभीर जखमी
उजनी धरणासमोर असलेल्या भीमानगर येथे टँकर आणि ट्रक यांच्या धडकेत हा अपघात (Solapur Pune Highway Accident) झाला. उजनी धरणानजीक भीमा नदी पुलावर रस्त्याचे काम सुरु आहे
सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur Pune Highway) झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. उजनी धरणासमोर असलेल्या भीमानगर येथे टँकर आणि ट्रक यांच्या धडकेत हा अपघात (Solapur Pune Highway Accident) झाला. उजनी धरणानजीक भीमा नदी पुलावर रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन एकेरी वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. घपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी जखमींना इंदापूर (Indapur) येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच, पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली.
अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर पुणे महामार्गावर शनीवारी उशीरा रात्री मळीने भरलेला ट्रक प्रवास करत होता. हा ट्रक इंदापूरच्या दिशेने निघाला होता. दुसऱ्या बाजूला तांदळाने भरलेला एक ट्रक सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. दोन्ही वाहने भिमानगर परिसरात असलेल्या धाब्याजवळ समोरासमोर आली असता टँकरचालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. हा टँकर प्रथम रस्ता दुभाजकाला धडकला त्यानंतर तो तांदळाच्या ट्रकवर येऊन आदळला. त्यामुळे हा अपघात घडला. उजनी धरणानजीक भीमा नदी पुलावर रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन एकेरी वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Pune Accident: पुण्यामध्ये मेट्रो बांधकामाचा बॅरिकेड अंगावर पडल्याने 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, तब्बल 1 महिन्यानंतर मृत्यूशी झुंज अपयशी)
अपघात इतका भीषण होता की, या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. तर, सहा जण गंभीर जखमी झाले. दोन वाहनांची धडक झाली तेव्हा मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील लोक घटनास्थळी आले. तेव्हा त्यांना अपघात घडल्याची माहिती कळाली. स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. जखमींना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेज, पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे आगोदच एके सुरु असलेली वाहतूक दोन तासांसाठी ठप्प झाली. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर जवळपास दीड किलोमीटर अंतरावरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.