Police Murder Case: शतपावली साठी गेलेले पोलीस निरिक्षक घरी परतलेच नाही; सकाळी परिसरात सापडला रक्तबंबाळ मृतदेह
सांगोला येथे पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
Police Murder Case: सोलापूरच्या सांगोली परिसरात पोलीस उपनिरीक्षकाची हत्या केल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीनी मागून येवून धारदार शस्त्रांनी वार केला आणि रक्तबंबाळ झालेली व्यक्ती जमीनीवर पडली. सांगोला तालुक्यातील वासूद येथील केदारवाडी येथील रहिवासी होते. पोलीस उपनिरिक्षक बुधवारी रात्री जेवण झाल्यावर घराच्या बाहेर पडले. शतपावली करण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरिक्षक घरात उशीरा पर्यंत परतले नाही.त्यामुळे घरांच्या लोकांनी शोध घेतला तर गुरुवारी सकाळी त्यांच्या मृतदेह परिसरात आढळून आला.
बुधवारी रात्री जेवण झाल्यावर सुरज विष्णू चंदनशिवे हे परिसरात नेहमी शतपावली करण्यासाठी निघाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शतपावली झाल्यानंतर घरी परताना, रस्त्यावरून अज्ञात व्यक्तीनी येवून मागून धारदार शस्त्रांनी प्राणघात हल्ला केला. सुरज जागेवर रक्तबंबाळ अवस्थेत पडले. हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. बऱ्याच उशीरा पर्यंत सुरज घरी परतले नाही त्यामुळे घरांच्यानी शोधा शोध सुरु केली. रात्रभर शोध घेतल्यानंतर सकाळी उशीरा पर्यंत त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांत तक्रार केली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. परिसरात पोलीस उपनिरिक्षकाचा मृतदेह सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहे. सुरज यांच्या कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला परंतू अद्यापही त्याचा अहवाल समोर आला नाही अशी माहिती पोलीसांनी दिली.
भष्टाचार केल्या प्रकरणी सुरज चंदनशिवे यांनी 2018 रोजी पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होत. एक वर्षां पुर्वी त्यांना पुन्हा तालुक्यातील पोलीस ठाण्यात रुजू करून घेण्यात आले. दरम्यान दोन महिन्यांपुर्वी पुन्हा काही कारणांमुळे कामावरून बडकर्फ करण्यात आले होते.