Solapur News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर हल्ला प्रकरणी आरोपी तब्बल 8 वर्षांनी पोलिसात स्वत:हून हजर

तब्बल आठ वर्षांपूर्वी घडलेले हे प्रकरण या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला आले आहे. आमदार राजेंद्र राऊत यांचा भाऊ आणि इतर दोघे असे तिन आरोपी बार्शी पोलीस (Barshi Police Stations, Solapur) ठाण्यास स्वत:हून हजर झाले.

Arrested

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या तत्कालीन नेत्यावर झालेल्या हल्ल्यात फरार असलेला आरोपी तब्बल 8 वर्षांनी स्वत:हूनच पोलिसांत हजर झाला आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी घडलेले हे प्रकरण या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला आले आहे. आमदार राजेंद्र राऊत यांचा भाऊ आणि इतर दोघे असे तिन आरोपी बार्शी पोलीस (Barshi Police Stations, Solapur) ठाण्यास स्वत:हून हजर झाले. आरोपी स्वत:हून पोलिसांत हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर या तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

विजय राऊत, दिपक ढावरे, रणजित चांदणे अशी तीन आरोपींची नावे आहेत. हे प्रकरण साधारण आठ वर्षांपूर्वीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन तत्कालीन गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावर 1 ऑगस्ट 2014 रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. हल्ल्यामध्ये अक्कलकोटे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठीआयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. या हल्ला प्रकरणात त्याही वेळी आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू विजय राऊत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. परंतू, या प्रकरणातून सीआरपीसी 169 प्रमाणे विजय राऊत यांचे नाव वगळण्यात आले होते. (हेही वाचा, Sanjay Karle: पॅरोलवर सुटलेला कैदी संजय कार्ले याचा संशयास्पद मृत्यू; मुंबई गोवा महामार्गावर आलिशान चारचाकीत आढळला मृतदेह)

दरम्यान, फिर्यादी असलेल्या नागेश अक्कलकोटे यांनी या प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवला होता. त्यांनी आधी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय असा लढा सुरु ठेवला. दरम्यान, उच्च न्यायालयाने सीआरपीसी 169 ची अपील फेटाळले. परिणामी विजय राऊत यांच्यासह इतर दोघांचाही समावेश आरोपींच्या यादीत करावा लागला.

नागेश अक्कल कोटे हल्ला प्रकरणात बार्शी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 84/2014 भा.द.वि. 143, 147, 148, 307, 329, 324, 323, 504, 506, 149 व आर्म ऍक्ट 25 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालाच्या आदेशामुळे आमदार राजेंद्र राऊत यांचा भाऊ असलेल्या विजय राऊत याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अटकपूर्व जामीनासाटी त्याने बार्शी सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. जो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात चकरा मारुनही जामीन मिळत नाही म्हटल्यावर आरोपी स्वत:हून पोलिसांमध्ये हजर झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif