Solapur Crime: आईच्या प्रियकराची हत्या, स्विफ्ट कारमध्ये मृतदेह पेटलवा, सोलापूर येथे सख्या भावांचे कृत्य

सदर व्यक्तीची हत्या सुनील शांताराम घाडगे (वय-२८) आणि राहुल शांताराम घाडगे (वय-३०, दोघे रा. अंदरसुल, ता. येवला जि नाशिक) या दोघांनी केल्याचा आरोप आहे. हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. श्रावण चव्हाण याच्यासोबत आईचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या रागातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Crime | (File image)

Extramarital Affairs: स्विफ्ट कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्यात सोलापूर (Solapur Crime) पोलिसांना यश आले आहे. श्रावण रघुनाथ चव्हाण (रा. अडसुरेगाव, ता.येवला, जि. नाशिक) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. श्रावण चव्हाण यांचा मृतदेह करमाळा शहराजवळ सोलापूर-अहमदनगर रस्त्यावर उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमध्ये आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींपर्यंत धागेदोरे शोधून काढले. सदर व्यक्तीची हत्या सुनील शांताराम घाडगे (वय-२८) आणि राहुल शांताराम घाडगे (वय-३०, दोघे रा. अंदरसुल, ता. येवला जि नाशिक) या दोघांनी केल्याचा आरोप आहे. हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. श्रावण चव्हाण याच्यासोबत आईचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या रागातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस दोन्ही आरोपींकडे चौकशी करत आहेत.

करमाळा पोलिसांनी मयताचा भाऊ संभाजी रघुनाथ चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेबाबत माहिती अशी की, करमाळा-अहमदनगर रस्त्यावरील एमआयडीसी परिसरात असलेल्या आडराणात पोलिसांना एक स्विफ्ट कार (क्रमांक एम. एच. १५ सी. टी. ८००६) बेवारस आढळून आली. पोलिसांनी जवळ जाऊन कारची पाहणी केली असता त्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी नोंद घेत तपास सुरु केला. पोलिस तपासात सदर व्यक्तीचा मृतदेह हा मृतदेह श्रावण रघुनाथ चव्हाण यांचा असल्याची खात्री पटली. दरम्यान, पोलिसांनी मयताच्या नातेवाईकाशी संपर्क साधला असता मयताचा भाऊ रघुनाथ चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरुन धक्कादायक प्रकार पुढे आला. हा खून विवाहबाह्य संबंधातून झाला असावा अशी पोलिसांची खात्री पटली पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला. (हेही वाचा, Kolhapur News: गर्लफ्रेंडने प्रियकराला मध्यरात्री घरी एकांतात बोलावले, पण घात झाला; कुटुंबीय परतले, पुढे नको ते घडले)

मयत श्रावण रघुनाथ चव्हाण यांचा भाऊ संभाजी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आरोपीच्या आईशी माझ्या भावाचे विवाहबाह्य संबंध होते. त्यातूनच आरोपींनी माझ्या भावाची हत्या केली असावी असा संशय आहे. ही हत्या सुनील शांताराम घाडगे व राहुल शांताराम घाडगे या दोन भावांनी केली असावी असा संशय आहे. आरोपींनी माझ्या भावाला सकाळी साडेनऊ वाजणेच्या सुमारास अंदरसूल येथे बोलावले होते. तो दिवस 3 जून होता. तेव्हाच या दोघांनी माझ्या भावाला ठार मारले असावे आणि त्याचा मृतदेह काारमध्ये टाकून जाळला असावा, असे फिर्यादीने म्हटले होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केली असून तपास सुरु आहे.