Social Media Influencer Goes Missing In Pune: पुण्यात लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर Mayuri Pawar बेपत्ता; घरात सापडली सुसाईड नोट, लाखो लोक करतात फॉलो

मयुरीने ‘टिक टॉक’ या व्यासपिठावरून आपली कारकीर्द सुरू केली. टिक टॉकवर मयुरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिथे तिचे लाखो फॉलोअर्स होते. त्यानंतर, केंद्र सरकारने टिक टॉकवर बंदी घातल्यानंतर, तिने तिचे लक्ष इंस्टाग्रामकडे वळवले.

Mayuri Pawar (Photo Credit : Instagram)

Social Media Influencer Goes Missing In Pune: पुण्यातून (Pune) एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Influencer) बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार प्राप्त झाली असून, तिचा शोध सुरू आहे. मयुरी चैतन्य मोडक-पवार (Mayuri Chaitanya Modak-Pawar) (वय 26, रा. रास्ता पेठ) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. मयुरीचे इन्स्टाग्रामवर 1.3 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अहवालानुसार, मयुरी 15 जूनपासून तिच्या घरातून बेपत्ता आहे. तिने मागे एक सुसाईड नोट सोडली आहे. त्याव्यतिरीक्त तिने इतर कोणाजवळ कोणालाच तपशील उघड केला नाही.

पुणे मिररने याबाबत वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी पवार ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'माऊ' या नावाने ओळखली जाते. सोशल मीडियाद्वारे पुणे शहराची ओळख सर्वदुर व्हावी व शहरातील विकास कामे सर्वांपर्यंत पोहोचावी हा दृष्टिकोन समोर ठेवून ती सोशल मीडियाच्या मायाजाळामध्ये आली असल्याचे तिने सांगितले होते.

मयुरीने ‘टिक टॉक’ या व्यासपिठावरून आपली कारकीर्द सुरू केली. टिक टॉकवर मयुरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिथे तिचे लाखो फॉलोअर्स होते. त्यानंतर, केंद्र सरकारने टिक टॉकवर बंदी घातल्यानंतर, तिने तिचे लक्ष इंस्टाग्रामकडे वळवले. बघता बघता मयुरी इंस्टाग्रामवरही लोकप्रिय झाली. तिथे तिचे सध्या 1.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. कालांतराने तिने 'दुर्गा ग्रुप' नावाने कपड्यांचा व्यवसायही सुरू केला. (हेही वाचा: Pub and Bar Entry rules: वयाचा पुरावा दाखवला तरच मिळणार पब आणि बारमध्ये प्रवेश; शासनाचे नवे नियम माहित आहेत का?)

माहितीनुसार, मयुरी 15 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. तेव्हापासून ती परतली नाही. या प्रकरणी तिचे काका मंगल दिलीप पवार (वय 40) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस सहायक निरीक्षक संतोष मोरे करीत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now