Nagpur Lockdown: नागपूरच्या कॉटन मार्केट मध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; 15 मार्चपासून कडक लॉकडाऊन
दरम्यान नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. मात्र पुन्हा कोविड 19 च्य रूग्णसंख्येमध्ये वाढा होताना पहायला मिळालं आहे. नागपूरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता नागपूर मध्ये 15 ते 21 मार्च दरम्यान कडक लॉकडाऊन लावला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. पण आता 6 दिवसांचा लॉकडाऊन लागणार असल्याने खरेदीसाठी अनेकजण बाहेर पडले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, भाजी मंडई मध्ये वाढत्या कोरोनारूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर देखील लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात लोकं रस्त्यावर उतरल्याचं पहायलं मिळालं आहे. Nagpur Lockdown: नागपूर शहरामध्ये 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान कडक लॉकडाऊन.
नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये नागपूरकरांनी मोठी गर्दी केली असल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. पुणे, मुंबई शहरामध्ये सरकारने लॉकडाऊन जाहीर न करता लसीकरण मोहिम वेगवान केली आहे. तर इतर सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपा पक्षा कडून मात्र नागपूर मधील या कडक लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यात आला आहे.
नागपूरातील दृश्य
महाराष्ट्रात काल 15817 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवे 11344 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2117744 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत . राज्यात एकूण 110485 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.79% झाले आहे.