Anna Hazare Protest: शेतकरी प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आंदोलनाचा इशारा
मात्र, सरकारने अद्याप एकाही मुद्द्यावर समाधानकारक भूमिका घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आपण आंदोलन करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांबाबत अण्णा हजारे यांनी या आधीही आंदोलन केले आ
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्वरीत तोडगा काढावा. त्यांच्या मागण्या मान्य करव्यात अन्यथा येत्या जानेवारी महिन्यापासून आपण पुन्हा एकदा दिल्ली येथे आंदोलन (Anna Hazare Protest) करणार असल्याचे म्हटले आहे. अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला याबाबत एक पत्रही लिहिले आहे. मात्र, अण्णा हजारे यांनी आपल्या आंदोलनाची तारीख, स्थळ आणि वेळ याबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही.
अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेले तीन वर्षे ते शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारने अद्याप एकाही मुद्द्यावर समाधानकारक भूमिका घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आपण आंदोलन करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांबाबत अण्णा हजारे यांनी या आधीही आंदोलन केले आहे.
दिल्ली येथे 21 मार्च 2018 मध्ये अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते. त्या वेळी तत्कालीन कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन हजारे यांची भेट घेतली. या भेटीत अण्णा हजारे यांच्या मागण्या स्वीकारत त्या लवकर पूर्ण करण्यात येतील असे अश्वासन दिले. परंतू, पुढे त्या मागण्या कधीही पूर्ण झाल्या नाहीत, असा त्यांचा दावा आहे. (हेही वाचा, Anna Hazare यांनी शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात उपोषण करण्याचा दिला इशारा)
दरम्यान, अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी 2019 रोजी राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरु केले होते. तेव्हाही तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जाऊन त्यांची भेट घेतली. उपोषण सुटले पण मागण्या तशाच भीजत पडल्या.