मुंबई: कांदा वाहतुकीच्या नावाखाली तब्बल 20 लाखांच्या गुटख्याची तस्करी; वाहनचालकाला अटक
तसेच ज्या ठिकाणी गुटख्याची विक्री केली जाते, अशा परिसरात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) बंदी असतानाही राज्यात काही भागात बेकादेशीर पद्धतीने गुटख्याची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी गुटख्याची विक्री केली जाते, अशा परिसरात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. यातच विरार येथील वालीव परिसरात कांदा वाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची तस्करी केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी वाहनचालकावर कारवाई केली आहे. तसेच या कारवाईत 20 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील पान टपऱ्या बंद आहेत. मात्र, तरीही बऱ्याच ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री होत असल्याचे समजत आहे.
कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशात लॉकडाउन चौथा टप्पा सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राज्यात काही भागात मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत आहे. वालीव पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी एक कांद्याचा ट्रक गुजरात वापीवरून नालासोपारा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नालासोपारा पेल्हार येथे सापळा रचला आणि पोलिसांनी पाळत ठेवत पेल्हार येथे हा ट्रक अडवला. या ट्रकमध्ये पोलिसांनी तपासणी केली असता सुरूवातीच्या काही गोण्या कांद्याने भरलेल्या होत्या तर पुढच्या काही गोण्यांमध्ये गुटख्याची पाकिटे आढळली, अशी माहिती लोकसत्ताने दिली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रातून आतापर्यंत 191 रेल्वे गाड्यांनी 2 लाख 45 हजार परप्रांतीय कामगारांना मूळ राज्यात पोहोचवलं - अनिल देशमुख
सध्याच्या टाळेबंदीच्या काळात पान टपऱ्या बंद आहेत. मात्र, तरीही बऱ्याच ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री सुरू आहे. या तस्करींसाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांचा वापर केला जात आहे. नालासोपारा येथे शुक्रवारी दारूची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.