SIT in Disha Salian's Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT स्थापन, राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश

त्यामुळे आता या चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी (Disha Salian Case) एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी आता अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Aaditya Thackeray News: दिशा सॅलियन प्रकरण आणि SIT बाबत आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर 'भीतीतून बदनाम करण्याचे उद्योग')

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विरोधकांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.  मालाडमधील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा संबंध असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता.