Sion Guru Kripa Owner passes away: समोसा साठी प्रसिद्ध सायनच्या गुरू कृपा हॉटेलचे मालक विशिनदास वाधवा यांचे निधन
गुरु कृपा हॉटेलचे मालक (Guru Kripa Owner) विशिनदास वाधवा (Vishindas Wadhwa) यांचे आज निधन झाले.
मुंबईतील सायन भागात चविष्ट आणि चमचमीत समोशांसाठी (Samosa Hub) प्रसिद्ध असलेले गुरु कृपा हॉटेलचे मालक (Guru Kripa Owner) विशिनदास वाधवा (Vishindas Wadhwa) यांचे आज निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांना हृदयासंबंधीच्या काही समस्या निर्माण झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनेक वर्षे जुने असलेले सायन मधील गुरु कृपा हे हॉटेल समोसा आणि छोले चाट साठी खूप लोकप्रिय आहे. अनेक दिग्गज नेत्यांसह कलाकार आणि दिग्गज खेळाडू या समोशाचे चाहते आहेत. आज सकाळपासूनच हे गुरु कृपा हॉटेल बंद ठेवण्यात आले होते.
मुंबईत समोशासाठी प्रसिद्ध असलेले गुरु कृपा हॉटेल ही अनेक दिग्गजांची पहिली पसंती आहे. कॉलेज विद्यार्थ्यांपासून अनेक प्रसिद्ध कलाकार या समोशाचे चाहते आहेत. येथील छोले चाटही प्रचंड लोकप्रिय आहे. या हॉटेलचे मालक विशिनदास वाधवा ही गेली अनेक वर्षे हा व्यवसाय सांभाळत होते. त्यांचा नातू भारत ने त्यांच्या निधनाची बातमी दिली. या बातमीने त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला.हेदेखील वाचा- Laxman Sheth Murdeshwar Passes Away: ठाण्यातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळ चे मालक लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांचे निधन, गेल्या 15 दिवसांपासून होते आजारी
विशिनदास वाधवा यांच्यावर आज सायनमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या दु:खद निधनामुळे आज सायनमधील गुरु कृपा हॉटेल आज बंद राहील. उद्या ते पुन्हा उघडण्यात येईल. विशिनदास वाधवा यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र गोविंद त्यांचा हा वारसा पुढे चालवतील असे सांगण्यात येत आहे.
या गुरु कृपा हॉटेलचे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते राज कपूर, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन सारखे अनेक ग्राहक राहिलेले आहेत. यांच्या समोशाची चवीचे अनेक दिग्गज दिवाने आहेत. संपूर्ण मुंबईत या हॉटेलचा समोसा आणि छोले चाट प्रसिद्ध आहेत.