Mumbai Sindhudurg Flight Ticket Expensive: सिंधुदुर्ग ते मुंबई हवाई प्रवास महागला, महिनाभरात तिकीटाचे दर तब्बल चारपट वाढले
महिनाभरापूर्वी मुंबईहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी ज्या विमानाला 2500 रुपये द्यावे लागायचे त्याच विमानातून प्रवास करण्यासाठी आता तब्बल 12 हजार रुपये मोजावे लागतायत.
केंद्रीय विमान वाहतूक उड्डानमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, (Jyotiraditya Scindia) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Naryan Rane) यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी (Chipi) विमानतळाचं उद्घाटन मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. 9 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु झाली. सिंधुदुर्गवासीयांसाठी ही निश्चितच मोठी खुशखबर होती. पण आता हीच विमान सेवा महागली आहे. उद्घाटन सोहळ्याला जेमतेम महिना उलटून गेलेला असतानाच मुंबई (Mumbai) ते सिंधुदूर्ग (Sindudurga) हवाई प्रवास विमान तिकीटाचे दर तब्बल चार पट वाढले आहेत. त्यामुळे विमान प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या कोकणवासियाची मात्र घोर निराशा झाली आहे. महिनाभरापूर्वी मुंबईहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी ज्या विमानाला 2500 रुपये द्यावे लागायचे त्याच विमानातून प्रवास करण्यासाठी आता तब्बल 12 हजार रुपये मोजावे लागतायत. (हे ही वाचा ST Workers Strike: चंद्रपूर येथे 14 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन; राज्य सरकारकडून कारवाईस सुरुवात.)
सिंधुदुर्गतील चिपी विमानतळ उडान योजनेत असताना तिकीटाचे दर वाढल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तसंही सणासुदीत विमान तिकीटाचे दर वाढतात हे खरंय पण हे दर आणखीनच वाढण्याची शक्यता आता वर्तवली जातीय.
विमानसेवा सुरु होऊन जेमतेम महिना उलटलाय पण गेल्या महिनाभरात या विमानसेवाला चाकरमन्यांना जोरदार प्रतिसाद दिला. गेल्या महिनाभरात विमानाचं तिकीट मिळणं मुश्किल होतं. त्यात दसरा दिवाळीमुळे तर तिकीटांचं बुकिंग अगोदरच झालं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2500 हजारांवरुन विमान तिकीट आता 12 हजारांवर जाऊन पोहोचलं आहे.
चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात विमानाने जाण्याचं प्रत्येक कोकणवासियाचं स्वप्न होतं. अगदी अडीज तीन हजार खर्च करुन आपण गावी जाऊयात, असं चाकरमनी मोठ्या अभिमानाने सांगत होते. पण आता तीन हजारांचं तिकीट तब्बल 12 हजार रुपयांना घ्यावं लागणार आहे. चाकरमान्यांच्या वाढत्या मागणीमुळे तिकीट अडीच हजार रुपयांवरून 12 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.