Sindhudurg Shocker: संतापजनक ! तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न; चार पोलिसांसह दोन सरकारी कर्मचाऱ्याला अटक
एका १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थींचा वियनभंग आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Sindhudurg Shocker: महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका 18 वर्षीय नर्सिंग विद्यार्थींचा वियनभंग आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींमध्ये चार पोलिस आणि दोन सरकारी कर्मचारी असल्याची माहिती आहे. मंगळवारी सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा- बांगलादेशी ॲडल्ट स्टार रिया बर्डेला उल्हासनगरमध्ये अटक; कोण आहे आरोही उर्फ रिया बर्डे? वाचा सविस्तर)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये वसई येथील दोन पोलिस कॉन्स्टेबल, एक सीआयएस जवान आणि एसआरपीएफ जवान यांचा समावेश आहे. हे सर्व जण वसई येथून भाड्याने घेतलेल्या कारने गोव्याल जात होता. वसई विरार पोलिस आयुक्ताने वसई वाहतूक हवालदार हरिराम गिठे आणि प्रवीण रानडे यांना पोलिस खात्याचे नाव खराब केल्याबद्दल कामावरून निलंबित करण्यात आले आहे. माधव केंद्रे, श्याम गिठे, सत्व केंद्र आणि शंकर गिठे अशी अन्य आरोपींची नावे आहे. घटनेच्या वेळीस सर्व जण दारूच्या नशेत होते. पोलिसांनी एसयुव्ही कार जप्त केली आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सकाळी 5.30 वाजता बस स्टॉपवर उभी असताना एक पुरुष रस्त्या विचारण्याच्या बहाणे, जवळ आला. तीनं दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या अज्ञात पुरुषाने तिचा पाठलाग केला. तीच्यावर अश्लिल कमेंट देखील केले. हरिराम असं त्यांचे नाव होते. पुढे जाऊन त्याने मित्राच्या मदतीने पीडितेला कारमध्ये बसवले. तेवढ्यात मुलीने आरडाओरड सुरु केला.
तरुणीचा आवाज ऐकताच, पादचारी कारजवळ आले. तरुणीची सुटका केली. घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी सर्व आरोपींना रस्त्यावर बसवले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सर्व आरोपीची अल्कोहोल टेस्ट घेण्यात आल्या आहेत.