Sindhudurg District Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक, मतदान संपले, उद्या मतमोजणी; निकालाआधीच शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने वातावरणात ताण पाहायला मिळत आहे. पोलीस मोठ्या संख्येने कुमक घेऊन कणकवलीत हजर आहेत. निवडणुकीत जिल्हा बँकेची असली तरी शिवसेना आणि नारायण राणे याच्यात नेहमीप्रमाणे जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Sindhudurg District Bank Election) निवडणुकीसाठी आज (30 डिसेंबर) मतदान पार पडले. या मदतानाची मतमोजणी यावर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान, मतदान पार पडताच शिवसेना ( Shiv Sena) आणि भाजप (BJP- राणे) समर्थक गटांमध्ये जोरदार उत्साहाचे वतावरण आहे. दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने वातावरणात ताण पाहायला मिळत आहे. पोलीस मोठ्या संख्येने कुमक घेऊन कणकवलीत हजर आहेत. निवडणुकीत जिल्हा बँकेची असली तरी शिवसेना आणि नारायण राणे याच्यात नेहमीप्रमाणे जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत नारायण राणे (Narayan Rane) , नितेश राणे, निलेश राणे या पितापुत्रांसह शिवसेना स्थानिक नेतृत्वाचीही प्रतिष्ठा पनाला लागली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या मतमोजणी होणार असली तरी, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी अतिआत्मविश्वासात आजच फटाके फोडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 19 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. 19 जागांसाठी एकूण 39 उमेदवार रिंगणात आहेत. (हेही वाचा, Nitesh Rane Seeks Pre-arrest Bail: संतोष परब हल्ला प्रकरणी नीतेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी)
दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीत महाविकासआघाडीचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर जीवघेना हल्ला झाला. या हल्ल्यातील संशयीत आरोपींना अटक झाली आहे. असे असले तरी या हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे असल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रारीतही त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी नतेश राणे यांनी कोर्टात अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी सुरु आहे. न्यायालयाच्या निर्णयावर नितेश राणे यांना अटक होणार किंवा नाही हे कळणार आहे.