IPL Auction 2025 Live

हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! जुन्या लोकल रेल्वेगाड्यांची जागा घेतली नवीन सिमेन्स लोकल

तसेच जुन्या रेट्रोफिटेड बनावटीच्या लोकल बाद झाल्या असून या लोकल भंगारात जाण्याची शक्यता आहे.

RetroFitted TrainVs Simens Train (Photo Credits: Wiki Commons)

Harbour Line Railway: हार्बर रेल्वे मार्गावरील (Harbour Railway Route) दुतर्फा झोपडपट्टी आणि साचलेल्या कच-याच्या ढिगा-यामुळे पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून क्षणी रेल्वे लाईन ठप्प होते. त्यात जुन्या रेल्वेगाड्या (रेट्रोफिटेड) पावसाळ्यात त्वरित बंद पडतात. यामुळे प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. यावर तोडगा काढत रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील जुन्या लोकल गाड्या बंद करुन नवीन सिमेन्स लोकल धावण्यास सुरुवात केली आहे. तसेच जुन्या रेट्रोफिटेड बनावटीच्या लोकल बाद झाल्या असून या लोकल भंगारात जाण्याची शक्यता आहे.

हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वेबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे हार्बर मार्गावरील सर्व लोकल ह्या सिमेन्स कंपनीच्या चालविण्यात येणार आहे. या सिमेन्स लोकलमुळे पावसाळ्यात बंद पडणार नाहीत, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. पावसाळ्यात रुळावर पाणी साचून रेट्रोफिटेड कंपनीच्या लोकल ठप्प होतात. त्यामानाने सीमेन्स बनावटीच्या लोकल साचलेल्या पाण्यातून चालवता येऊ शकतात.

हेही वाचा- पावसाळ्यात सुखद प्रवासासाठी हार्बर रेल्वे मार्गावर लवकरच धावणार सीमेन्स लोकल्स

सिमेन्स लोकलची बांधणी आधुनिक पद्धतीने असल्यामुळे खिडक्या आणि दरवाजे मोठ्या आकाराचे असणार आहेत. या लोकलचा वेग ८० ते १०० किमी असल्याने दोन स्थानकांमधील अंतर कमी वेळात पार करणे शक्य झाले आहे.

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावर नव्या लोकल गेल्या काही वर्षांत दाखल झाल्या त्या तुलनेत हार्बर मार्ग उपेक्षितच राहिला. मात्र, आता हार्बर रेल्वे प्रवाशांना नवीन सिमेन्स लोकलचा दिलासा मिळाला आहे.