Silver Oak Attack Case: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर; शरद पवार निवासस्थान हल्ला प्रकरण
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) याना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) हा जामीन मंजूर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक (Silver Oak) येथे एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणात (Silver Oak Attack Case) अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) याना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) हा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, हल्ला प्रकरणात घटनास्थळावरुन अटक झालेल्या कर्मचाऱ्यांनाही जामीन मिळाला आहे. या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते हे मुख्य आरोपी तर इतर कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आले आहे.
सिल्वर ओक हल्ला प्रकरणी अॅड. गुणरत्न सतावर्ते यांच्यासह जवळपास 115 कर्मचाऱ्यांना मुंबई, गावदेवी पोलिसांनी अटक केले होते. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदावर्ते यांच्यासह या सर्वांना आज जामीन मंजूर झाला आहे. (हेही वाचा, Kolhapur: गुणवंत सदावर्ते यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी, पुणे येथेही गुन्हा दाखल; अडचणी आणखी वाढल्या)
सिल्वर ओक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस अशी संपूर्ण महाविकासआघाडी आक्रमक झाली होती. दरम्यान, विरोधी पक्ष असलेल्या भाजपने प्रतिक्रीया देत अशी घटना चुकीची असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना सिल्वर ओक प्रकरणी जामीन मंजूर झाला असला तरी त्यांच्या अडचणी संपल्या नाहीत. सध्या ते कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सातारा पोलिसांकडून सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांनी मिळवला होता.