मुंबई: Coronavirus च्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर न्यास सोसायट्यांमध्ये जाऊन करणार रक्तदान शिबिराचे आयोजन
लोक भीतीमुळे वा लॉकडाऊन मुळे घरातून बाहेर पडत नसल्याने रक्ताची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. म्हणून यांच्या मदतीला धावून आलय प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिर संस्थान (Shree Siddhivinayak Trust). लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, आता या मंदिर न्यासाने मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.
सध्या संपूर्ण देशासह मुंबई कोरोना (COVID-19) सारख्या महाभयाण विषाणूच्या विळख्यात अडकला आहे. या कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांवर रुग्णांलयात उपचार सुरु आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात रक्ताची कमतरता भासत आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करा असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र लोक भीतीमुळे वा लॉकडाऊन मुळे घरातून बाहेर पडत नसल्याने रक्ताची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. म्हणून यांच्या मदतीला धावून आलय प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिर संस्थान (Shree Siddhivinayak Trust). लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, आता या मंदिर न्यासाने मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.
कोरोना ग्रस्तांशिवाय अन्य उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना देखील रक्तपुरवठा होत नाही आहे. लॉकडाऊन मुळे ही समस्या निर्माण झाली आहे. म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर समितीने मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे योजिले आहे. Coronavirus in India: भारत देशात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 834; तर कोरोनाचे एकूण 19 बळी
सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने 1 एप्रिल पासून ही रक्तदान योजना सुरु होणार आहे. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघे 10 ते 12 दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची योजना तयार केली.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आता हा आकडा 834 वर पोहचला आहे. तर 19 कोरोनाग्रस्त रुग्णांचा यात बळी गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे. त्यापैकी 67 रुग्ण यशस्वी उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून काहींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही काहीजण वैद्यकीय निगराणीखाली आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत देशात तब्बल 748 रुग्ण कोरोना बाधित आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)