NCB Drugs Case: Sushant Singh Rajput चा मित्र Siddharth Pithani ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
त्यानंतर त्याला मुंबईत कोर्टात दाखल करण्यात आले होते.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला येत्या 10 दिवसांत वर्ष पूर्ण होणार आहे. पण अद्याप त्याच्या मृत्यूचा उलगडा होऊ शकलेला नाही. केंद्रीय तपास यंत्रणा यामध्ये तपास करत असताना आता त्याच्या मृत्यू मध्ये ड्रग्स कनेक्शन देखील तपासले जात आहे. याच साखळीमध्ये काही दिवसांपूर्वी सुशांतचा रूम मेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani) ला अटक झाली होती. आता या प्रकरणामध्ये सिद्धार्थ पठाणीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती मुंबईच्या Narcotics Control Bureau ने दिली आहे.
सिद्धार्थ पिठानीला 28 मे दिवशी हैदराबाद मधून अटक झाली आहे. त्यानंतर त्याला मुंबईत कोर्टात दाखल करण्यात आले होते. या अटकेनंतर आता दुसर्यांदा त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थच्या चौकशीनंतर नीरज आणि केशव या दोघांनाही एनसीबी कडून समन्स जारी केला आहे. दरम्यान त्यांची देखील एनसीबी ऑफिसमध्ये चौकशी झाल्याचं सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह मागील वर्षी 14 जूनच्या दुपारी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आढळला. यानंतर मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये ड्रग्स कनेक्शन देखील समोर आलं. त्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना देखील अटक झाली होती. ते सध्या जामीनावर बाहेर आहेत.