Siddharth Jadhav On Raj Thackeray: राज ठाकरे आणि खालापूर टोल नाक्यावरील प्रसंग, सिद्धार्थ जाधव याने सांगितला अनुभव (Watch Video)

Siddharth Jadhav and Raj Thackeray | (Photo credit: archived, edited, representative image)

राज ठाकरे (Raj Thackeray), मनसे (MNS) आणि टोल नाका आंदोलन पाठिमागील काही वर्षांमध्ये काहिसे अधिकच घट्ट झाले आहे. मनसेच्या आंदोलनानंतर राज्यातील अनेक टोल नाके बंद झाल्याचा दावा केला जातो. काही प्रमाणात त्यात तथ्यही आहे. मात्र, असे असले तरी टोल नाक्यांवरील समस्या अद्यापही संपल्या नाहीत. दस्तुरखूद्द राज ठाकरे (Raj Thackeray At Toll Plaza) यांना खालापूर टोल नाका (Khalapur Toll Plaza) येथे हा अनुभव आला. अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने खालापूर टोल नाक्यावर घडलेला प्रसंग व्हिडिओ द्वारे सांगितला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

खालापूर टोल नाक्यावर वाहनांची प्रचंड रांग

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथे पार पडत असलेल्या शंभराव्या नाट्य संमेलनाला हजेरी लावून राज ठाकरे आणि सिद्धार्थ जाधव मुंबईला परतत होते. योगायोगाने दोघेही एकाच कारने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांची गाडी खालापूर टोल नाका येथे आली. या टोल नाक्यावर वाहनांची प्रचंड रांग होती. या रांगेत पाठिमागे बऱ्याच अंतरावर कोठेतरी रुग्णवाहीकाही वाट मिळण्याच्या प्रतिक्षेत होती. हे पाहून राज ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी आपल्या वाहनातून उतरुन टोल नाक्यावरील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. (हेही वाचा, Raj Thackeray on Marathi Manoos: रायगड आपला राहणार नाही, लाचार नेते मिंधे झाले, सतर्क राहा; राज ठाकरे यांचा इशारा)

राज ठाकरे संतापले

राज ठाकरे रांगेत आहेत हे पाहून पोलीस आणि खालापूर टोल नाका कर्मचाऱ्यांनी त्यांना वाट करुन दिली. मात्र, असे असले तरी राज ठाकरे यांनी त्याला नम्र नकार दिला. त्यांनी स्वत: तिथे उभा राहात रुग्णवाहिकेला रस्ता मिळेपर्यंत सर्व वाहने तातडीने सोडण्यास सांगितले. टोल व्यवस्थापनानेही कोणतेही प्रश्न उपस्थित न करता वाहनांची रांग सोडली आणि रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन दिली. (हेही वाचा, MNS On Marathi Signboards on shops: 'मराठी पाट्या लावा अन्यथा..खळखट्याक' मनसे कार्यकर्त्यांचा बॅनरद्वारे मुंबईतील दुकानदारांना इशारा)

पाहा व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Manse.Speaks | मनसे.बोलतोय (@manse.speaks)

सिद्धार्थ जाधव याने शेअर केला व्हिडिओ

अभिनेता सिद्धार्थ जाधव याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो स्वत:देखील या अनुभवाबाबत सांगतो आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता. सिद्धार्थ जाधव याने म्हटले आहे की, 'राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत मी प्रवास करत होतो. पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान खालापूर टोल नाक्यावर वाहनांची प्रचंड रांग लागली होती. जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावर वाहनांची रांग होती. पाठिमागे दूरवर कोठेतरी रुग्णवाहिका उभी होती. राजसाहेब स्वत: गाडी चालवत होते. त्यांनी ही रांग पाहिली आणि ते संतापले. त्यांना पाहून पोलिसांनी रस्ता मोकळा करुन दिला. मात्र, काही कळायच्या आतमध्ये ते खाली उतरले आणि त्यांनी त्यांच्या भाषेत समजावले. त्यांनी सांगितले, आताच्या आता सगळ्या गाड्या सोडा. त्यानंतर पटापट सगळ्या गाड्या सोडण्यात आल्या.' अभिनेत्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पुढे ज्या ज्या ठिकाणी टोल नाका आला तिथे तिथे त्यांनी असंच केलं. माझ्यासाठी तो विलक्षण अनुभव होता.