IPL Auction 2025 Live

श्रीगोंदा: बेलवंडी परिसरात 2 बेवारस मृतदेह आढळले; पोलीस तपास सुरु

ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या जवळ घडली. यात एका महिला आणि पुरुषाचा समावेश आहे.

(संग्रहित प्रतिमा)

एकाच ठिकाणी 2 व्यक्तीचा मृतदेह (2 Dead Bodies Found In Shrigonda) आढळल्यची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या जवळ घडली. यात एका महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. मृत महिलेचे वय 50 तर, पुरूषाचे वय 55 आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही मृतदेहाची ओळख पटलेली नसून आजूबाजूच्या परिसरात मृतदेहाचे फोटो पाठवण्यात आले आहेत. सध्या बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच मृतांची हत्या झाली की, त्यांनी स्वताच त्यांचे जीवन संपवले, याचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात एकाच जागेवर एका महिलासोबत पुरूषाचा मृतदेह आढळल्याने संबंधित ठिकाणी एकाच अडखळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख न पटल्यामुळे बेलवंडी पोलिसांना पुढील तपास करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे बेलवंडी पोलिसांनी दोन्ही मृतदेहाचा फोटो काढून पारनेर, सुपा, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा पोलिसांकडे पाठवला आहे, अशी माहिती निरीक्षक अरविंद माने यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सापडलेले मृतदेह हे श्रीगोंदा तालुक्यातील आहेत की, इतर कोणत्या ठिकाणांचे आहेत, असाही प्रश्न पोलिसांच्या समोर पडला आहे. गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असताना अनेक घटना आपल्या कानावर पडत आहेत. वरील घटना आत्महत्या आहे की, हत्या येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, असा विश्वास बेलवंडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- बालकनीतील लोखडांच्या गजाला कुत्रा बांधण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याचे चिन्ह दिसत आहेत. नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यात मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरुन तरुणीच्या वडील आणि काकांनी मुलाच्या भावाची हत्या केल्याची समोर आले होते. याघटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही आरोपीली अटक केली होती. तसेच ही हत्या आंतरजातीय प्रेमसंबंधातून घडली, अशी प्राथमिक माहिती मिळाली होती.