Shree Siddhi Mahaganpati Jalgaon: श्री सिद्धी महागणपती, देशातील सर्वात उंच गणेश मुर्तीची जळगाव येथे प्रतिष्ठापणा, उंची31 फूट, वजन तब्बल 100 टन
दावा केला जात आहे की, श्री सिद्धी महागणपती (Shree Siddhi Mahaganpati) म्हणून ओळखली जाणारी गणेशमुर्ती देशातील सर्वात उंच गणेशमुर्ती आहे.
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या पाळधी गाव हद्दीत उभारण्यात आलेल्या गणेश मुर्तीची (Ganesh Idol) देशबरात चर्चा सुरु आहे. दावा केला जात आहे की, श्री सिद्धी महागणपती (Shree Siddhi Mahaganpati) म्हणून ओळखली जाणारी गणेशमुर्ती देशातील सर्वात उंच गणेशमुर्ती आहे. श्री सिद्धी वेंकटेश देवस्थान द्वारा उभारण्यात येणाऱ्या गणेश मंदिरात ही मुर्ती प्रतिष्ठापीत करण्यात आली आहे. वैशिष्ट्य असे की, आगोदर मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर मंदीर उभारले जाणार आहे. देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने या मंदिराची उभारणी सुरु असल्याचे समजते.
दरम्यान, दावा केला जात आहे की, देशभरातील एकूण गणेश मुर्तीचा विचार करता या मुर्तीइतकी कोणतीच मुर्ती उंच नाही. देशातील सर्व गणेशमुर्तींमध्ये ही गणेश मुर्ती सर्वात उंच आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गाव हद्दीत उभारल्या जाणाऱ्या श्री सिद्धी महागणपती मुर्तीची उंची 31 फूट तर वजन तब्बल 100 किलो इतके आहे. आज असलेल्या संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi 2023) मुहूर्तावर या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. (हेही वाचा, Maghi Ganesh Jayanti 2023 HD Images: माघ विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छांसाठी Greetings, Wallpapers, WhatsApp Status; साजरी करा वरद चतुर्थी)
सांगितले जात आहे की, देशातील सर्वात उंच मुर्ती असे वर्णन करण्यात आलेली ही मुर्ती अखंड काळ्या पाषाणात तयार करण्यात आली आहे. साधारण 374 टन वजनाच्या अखंड काळ्या पाषाणात ही मुर्ती कोरण्यात आली आहे. 100 टन इतक्या वजनाच्या मुर्तीच्या आजूबासूनस 15 फूट उंचिच्या रिद्धी, सिद्धीच्या मुर्तीही पाहायला मिळतात गणपतीच्या सोंडेत मृत कुंभ, पोटावर नाग, आणि कपाळावर घंटा पाहायला मिळते. गणपतीसाठी सुमारे 200 किलो वजनाची घंटाही टांगण्यात आली आहे. अधुनिक स्थापत्यशैली आणि मुर्तीशास्त्राचा उत्कृष्ठ नमून म्हणून या मुर्ती आणि मंदिराकडे पाहिले जाईल असे सांगितले जात आहे.