Shravan 2023: महाराष्ट्रात नीज श्रावणाला सुरूवात; त्र्यंबकेश्‍वर मंदिरामध्ये भाविकांना पहाटे 5 पासून मिळणार दर्शन

तर 17 ऑगस्ट पासून निज श्रावण सुरू होणार आहे. तो 15 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.

Nashik | Twitter

महाराष्ट्रामध्ये अधिक महिन्याच्या श्रावणानंतर आता आज 17 ऑगस्ट पासून नीज श्रावण मासारंभ झाला आहे. श्रावणात देवधर्माला विशेष महत्त्व आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्येही मोठी गर्दी उसळते. यानिमित्तानेच व्हीआयपी दर्शन बंद केल्यानंतर आता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनाच्या वेळेतही बदल करण्यात आले आहे. आता मंदिर पहाटे 5 वाजता सुरू केले जाणार आहे. तर श्रावणी सोमवारी हेच मंदिर पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांच्या सेवेमध्ये असणार आहे. यामुळे अधिकाधिक भाविकांना दर्शन घेणं सोप्प होणार आहे.

श्रावणात नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वराचं मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले असणार आहे. तर श्रावणी सोमवारी ही वेळ पहाटे 4 ते रात्री 9 अशी करण्यात आली आहे. गावकऱ्यांना मंदिर उघडल्यानंतर सकाळी 10:30 पर्यंत तर संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत दर्शन घेता येणार आहे. Shravan Month 2023 in Maharashtra: यंदा 59 दिवसांचा श्रावण मास; जाणून घ्या श्रावण आणि अधिक श्रावण मासाच्या महाराष्ट्रातील तारखा काय? 

श्रावणासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये कोणती खास सोय असेल?

यंदा श्रावण मास हा अधिक मास म्हणून आला असल्याने तब्बल 59 दिवस हा महिना असणार आहे. यामधील अधिक महिना आता संपला असून नीज श्रावण सुरू झाला आहे. यामध्ये श्रावणी सोमवारी शिवभक्त शंकराच्या मंदिरात जाऊन खास बेल, दुग्ध अभिषेकासोबत शिवमूठ देखील अर्पण करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif