Shraddha Walkar Murder Case: 'होय, श्रद्धा वालकर हिची हत्या केली', अफताब पूनावाला याची न्यायालयात कबुली; कोर्टात काय घडलं? 5 महत्त्वाचे मुद्दे

श्रद्धा वालकर हिची हत्या केल्याचे आरोपी आफताब पूनावाला (Aaftab Poonawala) याने कोर्टात कबूल केले आहे. अफताब पूनावाला याची पोलीस कोठडी आज संपत होती. त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते.

Shraddha Walkar Murder Case | Representational Image (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. श्रद्धा वालकर हिची हत्या केल्याचे आरोपी आफताब पूनावाला (Aaftab Poonawala) याने कोर्टात कबूल केले आहे. अफताब पूनावाला याची पोलीस कोठडी आज संपत होती. त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याच्या पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली. आफताबने सुनावणीत कबूल केले की, त्याने त्याची लिव्ह-इन गर्लफ्रेंड श्रद्धा हिला "रागाच्या भरात" मारले. तो पुढे म्हणाला की आता त्याच्याबद्दल जे काही बोलले जात आहे ते पूर्णपणे सत्य नाही.

आफताब पूनावाला याची कोर्टात कबूली

आपली लिव्ह-इन गर्लफ्रेंड श्रद्धा वालकर हिच्या हत्येचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याने आज दिल्ली न्यायालयात कबूल केले की त्याने त्याने श्रद्धाची हत्या केली. (हेही वाचा, Shraddha Walker Murder Case: एकीचा मृतदेह फ्रीजमध्ये कोंबून दुसरी सोबत त्याच फ्लॅटवर डेट, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावाला याचे धक्कादायक कृत्य उघड)

पोलिसांना सहकार्य परंतू, घटनांचे स्मरण नाही

कोर्टात 28 वर्षीय आफताबने सांगितले की तो पोलिसांना सहकार्य करत आहे आणि त्याने शरीराचे अवयव जिथे फेकले त्या ठिकाणाचे नकाशे देखील दिले आहेत. त्याने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात पुढेही पालिसांना सहकार्य करु. पण, या घटनेचा पूर्ण तपशील आपल्याला आठवत नाही.

तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य

आफताबचे वकील अविनाश यांनी सांगितले की, तपास अधिका-यांना आफताबकडून पूर्णपणे सहकार्य मिळत आहे. पोलिसही त्याच्याशी चांगले वागतात. तो म्हणाला की तो त्यांची दिशाभूल करत नाही किंवा त्यांच्याशी खोटे बोलत नाही. दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की, 80 टक्के तपास पूर्ण झाला आहे. तपास वरिष्ठ अधिकारी हाताळत आहेत," असे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले.

या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्या पाच दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली.

रागाच्या भरात हत्या

आफताबने सुनावणीत कबूल केले की, त्याने त्याची लिव्ह-इन गर्लफ्रेंड श्रद्धा हिला "क्षणाच्या भरात" मारले. तो पुढे म्हणाला की आता त्याच्याबद्दल जे काही बोलले जात आहे ते “पूर्णपणे सत्य नाही”. 28 वर्षीय तरुणाने सांगितले की तो अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे आणि त्याने श्रद्धाच्या शरीराचे अवयव ज्या ठिकाणी टाकले त्या ठिकाणाचे नकाशे दिल्ली पोलिसांनाही दिले आहेत.

आफताबने सुनावणीत कबूल केले की, त्याने त्याची लिव्ह-इन गर्लफ्रेंड श्रद्धा हिला "रागाच्या भरात" मारले. तो पुढे म्हणाला की आता त्याच्याबद्दल जे काही बोलले जात आहे ते पूर्णपणे सत्य नाही.