IPL Auction 2025 Live

Shraddha Walkar Murder Case: आफताब पूनावाला याचे पोलिसांनाच आव्हान, श्रद्धा वालकर हिच्या हत्येचे कारणही सांगितले

श्रद्धा वालकर हिचा मारेकरी आफताब पूनावाला (Aftab Poonawalla) याने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली असली तरी त्याने ही हत्या नेमकी का केली? या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधत आहेत.

Shraddha Walkar Murder Case | Representational Image (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Walkar Murder Case) प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होऊ लागले आहे. श्रद्धा वालकर हिचा मारेकरी आफताब पूनावाला (Aftab Poonawalla) याने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली असली तरी त्याने ही हत्या नेमकी का केली? या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधत आहेत.  दुसऱ्या बाजूला आफताब पूनावाला दररोज नवनवे खुलासे करतो आहे. त्याने पोलिसांनाही आव्हान दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. नुकतीच त्याची नार्को आणि ‘पॉलीग्राफ लाय डिटेक्टर’ चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. श्रद्धाच्या हत्येचे कारण सांगताना 'आपण हे कृत्य रागाच्या भरात केले' असे त्याने म्हटले आहे.

आफताब पूनावाला आणि श्रद्धा यांच्यात काही कारणावरुन कडाक्याची भांडणे होत असत. ती त्याला अधूनमधून सोडून देण्याची धमकीही देत असे. त्यातून वाद वाढत असत. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने वृत्तानुसार, डेटिंग अॅप ‘बंबल’वर श्रद्धाला एक तरुण भेटला. या तरुणासोबत श्रद्धा डेटवर गेली. 17 मे रोजी संध्याकाळच्या वेळी डेटवर गेलेली श्रद्धा 18 मे रोजी दुपारी फ्लॅटवर परतली. श्रद्धा परत आल्यावर दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. यातून संतापलेल्या आफताब याने गळा दाबून तिची हत्या केली. श्रद्धाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. (हेही वाचा, Shraddha Walkar Murder Case: त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले, आम्ही त्यांचे 70 तुकडे करू; आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर हल्ला; Watch Video)

दरम्यान, ‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तात आफताबने चक्क पोलिसांनाच आव्हान दिल्याचे म्हटले आहे. आफताब याने पोलिसांना अगदी थंडपणे सांगितले की, 'होय, मी श्रद्धा वालकर हिचा खून केला आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तीच्या मृतदेहाचे तुकडे आणि ते तुकडे करण्यासाठी मी वापरलेली हत्यारे शोधून दाखवा. तुम्हाला हे माझं आव्हान आहे', असं आफताबने म्हटल्याचेही अमरउजालाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात आपण वापरलेले हत्याह गुरुग्राम येथील कार्यालयाजवळ झाडीत टाकल्याचे आफताबने म्हटले आहे.