Pune Shocker: धक्कादायक! पुण्यात मित्राची हत्या करून मृतदेह जाळला; ब्लूटुथच्या मदतीने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश
पुण्याच्या (Pune) बाणेरमध्ये एका अज्ञात व्यक्तीची हत्या (Murder) करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला होता.
पुण्याच्या (Pune) बाणेरमध्ये एका अज्ञात व्यक्तीची हत्या (Murder) करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. ही घटना नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात घडली होती. घटनास्थळी मिळालेल्या ब्लूटुथवरून खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत व्यक्तीच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याची पोलीस चौकशीतून समोर आले आहे. कोट्यवधींचे कर्ज असल्यामुळे आरोपीने मित्राचा खून करून तो व्यक्ती आपण स्वतः चा असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप पुंडलिक माईनकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, मेहबूब दस्तगीर शेख असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही मित्र आहेत. मात्र, मेहबूब शेख यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. तसेच त्याच्या दोन बायका असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कर्जातून मुक्त होण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्याच्या बाणेरमध्ये संदीपची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला होता. परंतु, चौकशी दरम्यान पोलिसांना संदीपच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. ज्यात त्याचे नाव होते. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी कानातील ब्लुटुथ मिळाले. याचदरम्यान, मेहबूबच्या पहिल्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दिली. त्यावेळी पोलिसांना मेहबूबवर संशय आला. अखेर, पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन ब्लूटुथचा तपशील आणि इतर चौकशी केल्यानंतर आरोपी हाच असल्याचे उघड झाले. या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Bhiwandi Accident: भिवंडीत Hit and Run प्रकरणी महाराष्ट्र पोलिसाचा मृत्यू
कर्जातून मुक्त होण्यासाठी आरोपीने हे धक्कादायक पाऊच उचलले असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आणि गुन्हे शाखा युनिट चारचे प्रसाद मोकळे तपास घेत होते. या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे यांच्यासहीत त्यांच्या पथकातील कर्मचारी सहभागी होते.