धक्कादायक! लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने यवतमाळ येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

दरम्यान, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना अनेक संकटाला सामोरे जावा लागत आहे. यातच लॉकडाऊनमुळे हातात रोजगार नसल्याने एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Suicide Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले आहेत. दरम्यान, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना अनेक संकटाला सामोरे जावा लागत आहे. यातच लॉकडाऊनमुळे हातात रोजगार नसल्याने एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना यवतमाळ (Yavatmal) येथील बाभूळगाव (Bhabhulgaon) परिसरात शनिवारी घडली आहे. रोजमजुरीची कामे करून मृत तरूण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. मात्र, लॉकडाऊनमुळे हाती कोणतेही काम नसल्याच्या चिंतेतून संबंधित तरुणाने आत्महत्या केली आहे. रोजगार नसल्याने कंटाळून आत्महत्येची दुसरी घटना आहे. यामुळे बाभूळगावात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीराम जांभुरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीराम हा आपली आई, पत्नी आणि मुलगीसह बाभूळगावात राहत होता. श्रीराम हा वडिलांच्या नावावर असलेली अडीच एकर शेती संभाळून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविता होता. मात्र, कोरोना विषाणूने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून महत्वाची पावले उचचली जात आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे काही काळाकरिता अनेकांच्या हातातून रोजगार निसटला आहे. याच रोजगारअभावी श्रीराम यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेची तक्रार माणिक जांभुरे बाभूळगाव पोलिसात दिली. या घटनेचा पुढील तपास जमादार किसन मंदिलकर हे करीत आहेत. हे देखील वाचा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थन

बाभळगाव तालुक्यात चार दिवसात दुसरी घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी घारफळ येथील प्रशांत मंगल ठाकरे नावाच्या एका व्यक्तीने बुधावारी गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रशांत हा पुण्यातील एका कंपनीत कार्यंरत होता. कोरोनाचे वाढते प्रादुर्भाव पाहता कंपनी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने तो गावी परतला होता. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून तो नैराश्यात होता, अशी माहिती समोर आली आहे.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

धक्कादायक! लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने यवतमाळ येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Amit Shah's Bag Check By EC: निवडणूक अधिकाऱ्यांकडून हिंगोलीत अमित शहा यांच्या बॅगची तपासणी, पहा व्हिडिओ

Consensual Sex With Minor Wife Is Rape: अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हाही बलात्कारच; Bombay High Court चा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील 12 लाखांहून अधिक कामगार विधानसभा मतदानापासून वंचित राहू शकतात; ऊस तोडणी संघटनेने व्यक्त केली चिंता

MNS Shivaji Park Rally Cancelled: मनसे कडून शिवाजी पार्क वरील 17 नोव्हेंबरची जाहीर सभा रद्द; मनसे अध्यक्षांनी कारणाचा केला खुलासा