Prisoner Suicide: धक्कादायक! धाकट्या भावाला आधी ठार मारले; कारागृहात गेल्यानंतर स्वत:ही केली आत्महत्या
या आत्महत्येच्या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी कारागृह प्रशासनाने अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.
चंद्रपूर जिल्हा कारागृहात (Chandrapur District Jail) एका कैद्याने (Prisoner) गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण कारागृहात एकच खळबळ माजली आहे. या आत्महत्येच्या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी कारागृह प्रशासनाने अधिक चौकशीला सुरुवात केली आहे. पोलीस पथक, कारागृह अधिकारी, न्यायदंडाधिकारी यांच्या हजेरीत मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे.
अंकित रामटेके असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. धाकट्या भावाच्या हत्येच्या आरोपाखाली अंकितला चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, अंकितने शनिवारी ट्रॅकपॅन्टच्या लेसने कारागृहातील बॅरेकमध्ये गळफास घेतला. त्याचा मृतदेह गजाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अंकित रामटेके याने आजूबाजुला जवळपास 100-150 कैदी असताना आत्महत्या कशी केली? असा प्रश्न कारागृह प्रशासनाला पडला आहे. विशेष म्हणजे, गळफास घेताना आपण कोणाला दिसू नये, यासाठी अंकितने गजाला टॉवेल आणि शर्ट लटकावला होता. थोड्या वेळाने टॉवेल पडल्यावर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत दिले आहे. हे देखील वाचा- Mumbai: लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणाऱ्या पार्टनरकडून महिलेची निर्घृण हत्या; आरोपी फरार
अंकित हा दुर्गापूर येथील रहिवाशी आहे. दरम्यान, अंकितने जुलै महिन्यात आपला धाकटा भाऊ अनिकेत रामटेके यांची निघृण हत्या केली होती. त्यानंतर अंकित रामटेके याची रवानगी जिल्हा कारागृहात झाली होती. मात्र, अंकितने कारागृहात गेल्यानंतर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2020 05:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

