Panvel: मास्क न घातलेल्या व्यक्तीला दंड भरण्यास सांगितल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांसमोरच त्याने स्वत:च्या अंगावर ओतले रॉकेल; पनवेल येथील घटना

तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र, मास्क न घातलेल्या एका व्यक्तीला दंड भरण्यास सांगितल्यानंतर त्याने चक्क पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आयुष्य संपवण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क (Mask) घालणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र, मास्क न घातलेल्या एका व्यक्तीला दंड भरण्यास सांगितल्यानंतर त्याने चक्क पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आयुष्य संपवण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation) क्षेत्रात घडली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात पनवेलमधील खांदेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसिफ सिद्दीकी (वय, 43) असे आरोपीचे नाव आहे. आसिफ यांची पनवेलमधील सेक्टर 6 येथील परिसरात बेकरी आहे. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अजिंक्य हलाडे आणि त्यांचे सुपरवायझर संदीप कांबळे यांनी सार्वजनिक ठिकाणी व दुकानांमध्ये मास्क न घातलेल्या लोकांना एकत्र केले होते. त्यावेळी आसिफ आणि त्यांचा मुलगा अमन (वय, 19) मास्क न घातलेले आढळल्यानंतर त्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दंड भरण्यास सांगितला. परंतु, या दोघांनी दंड भरण्यास नकार देत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी आसिफ पालिका आधिकाऱ्यावर चिडले. त्यानंतर त्यांनी स्वत:वर रॉकेल ओतून घेतले आणि आयुष्य संपवण्याची धमकी दिली. यामुळे आसिफ आणि त्यांच्या मुलगा अमन यांच्याविरोधात खांदेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा- Republic TV चे डिस्ट्रीब्युशन असिस्टंट VP Ghanshyam Singh यांना मुंबई पोलिसांकडून अटक

एक कोरोना रुग्ण मास्क न घातल्यास गर्दीत फिरल्यास तो 400 जणांना संक्रमित करतो. त्यामुळे प्रत्येकाला मास्क घालणे गरजेचे आहे. मास्क न घातल्यास दंड आकारला जात आहे. मास्क न घालणाऱ्या नागरिकांच्या विरोधात एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत कारवाई केली गेली. या कारवाईत महापालिकेने तब्बल 4.78 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.