धक्कादायक! Mumbai मध्ये खोट्या RT-PCR रिपोर्टचा काळाबाजार; सायबर कॅफेच्या ऑपरेटरला अटक

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका सायबर कॅफेच्या ऑपरेटरला (Cyber Cafe Operator) अटक केली आहे, जो जास्तीचे पैसे कमवण्यासाठी लोकांना कोरोना विषाणूचे बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट (RT-PCR Negative Certificate) पुरवत होता

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका सायबर कॅफेच्या ऑपरेटरला (Cyber Cafe Operator) अटक केली आहे, जो जास्तीचे पैसे कमवण्यासाठी लोकांना कोरोना विषाणूचे बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट (RT-PCR Negative Certificate) पुरवत होता. मुंबई गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती दक्षिण मुंबईत एक सायबर कॅफे चालवत आहे, जो लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्यासाठी खोटे आरटीपीसीआर अहवाल तयार करत आहे. त्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी बोगस ग्राहक बनून त्याच्याकडे गेले आणि या व्यक्तीला जाळ्यात अडकवत त्याच्याकडून बनावट रिपोर्टची मागणी केली.

या सायबर कॅफे ऑपरेटरने कोणत्याही तपासणीशिवाय ग्राहकांच्या विनंतीवरून पॅथॉलॉजी लॅबच्या नावाने एक बनावट कोविड-19 निगेटिव्ह सर्टिफिकेट दिले. यासाठी त्याने 700 रुपये आकारले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि कॅफेमधून काही प्रमाणपत्रे, पॅथॉलॉजी लॅबचे लेटरहेड, संगणक आणि इतर उपकरणे जप्त केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. या व्यक्तीविरुद्ध कलम 420, 465 आणि आयपीसीच्या इतर संबंधित तरतुदींखाली एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मुंबईमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झालेले नाहीत. अशात इतर काही राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी, आरटीपीसीआरचा नकारात्मक अहवाल किंवा लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. या पार्श्वभुमीवर ही व्यक्ती अवघ्या 700 रुपयांमध्ये लोकांना खोटे रिपोर्ट पुरवत आहे. (हेही वाचा: COVID-19 ची तिसरी लाट मागील 2 लाटांच्या तुलनेत अधिक भयावह असेल? मुंबई, पुणे साठी अलर्ट)

दरम्यान, मुंबईमध्ये 26 ऑगस्त रोजी 397 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 507 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरात एकूण 721257 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात एकूण 2736 सक्रीय रुग्ण आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif