धक्कादायक! South Mumbai येथील 2 बिल्डींगमध्ये आढळले तब्बल 32 कोरोना विषाणूचे रुग्ण; BMC ने सीलबंद केल्या इमारती
या विषाणूचा सामना करण्यासाठी इतके दिवस संपूर्ण देश लॉक डाऊनमध्ये होता, मात्र 5 जून रोजी महाराष्ट्र सरकारने काही नियम शिथिल केले.
दिवसेंदिवस महाराष्ट्र आणि राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) येथील कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी इतके दिवस संपूर्ण देश लॉक डाऊनमध्ये होता, मात्र 5 जून रोजी महाराष्ट्र सरकारने काही नियम शिथिल केले. त्यानंतर सोसायटी वाल्यांनीही आपले नियम शिथिल करून बाहेरून लोकांना घरकाम करण्यास येण्याची परवानगी दिली. आता मुंबईच्या लोकप्रिय परिसर दक्षिण मुंबई (South Mumbai) तेथील एका सोसायटी मध्ये 32 कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर बीएमसीने (BMC) बिल्डींग सील केल्या आहेत.
मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, भुलाभाई देसाई रोडवरील सागर दर्शन इमारतीत दहा आणि नेपियन सी रोडवरील टहनी हाइट्समध्ये 22 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याबाबत डी प्रभागचे (D Ward) सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड म्हणाले की, 'सर्व इमारतीतील रहिवाशांनी सामाजिक अंतर पाळले पाहिजे कारण कोविड-19 प्रकरणे अजूनही समोर येत आहेत.' दोन बिल्डींगमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकरणे समोर आल्यावर, प्रक्रियेनुसार इमारती सीलबंद करण्यात आल्या आहे आणि फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच परवानगी देण्यात आली आहे. सागर दर्शन इमारतीमधील बहुतेक केसेस या तिथल्या रहिवाशांच्या आहेत, तर टहनी हाइट्समध्ये 20 प्रकरणे ही बाहेरील मदतनीसांशी निगडीत आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्रातील पोलीस दलातील आणखी 88 कर्मचाऱ्यांना COVID19 चे संक्रमण तर एकाचा मृत्यू; कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्या पार)
याबाबत बीएमसीने सोसायटीमधील लोकांना जबाबदार ठरवले आहे. सरकारने नियम शिथिल केल्यावर सर्व लोक हा असे वागू लागले आहेत, जणू काही ही महामारी संपलीच आहे. सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी ड्रायव्हर आणि घरात काम करणाऱ्या महिलांना येण्यास परवानगी द्यावी याबाबत वाद झाला होता. आता याच गोष्टीचा परिणाम समोर आला आहे. दरम्यान, 18 जूनपर्यंत डी वॉर्डमध्ये कोरोनाची 1,950 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 1,023 लोक बरे झाले आहेत. इथला डेली ग्रोथ रेट 2.2. टक्के आहे, जो शहराच्या वाढीच्या घटनांच्या बरोबरीचा आहे. या प्रभागात आठ झोपडपट्टी आहेत.