शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पावसावर शायराना अंदाज, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना संततधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवर शायराना अंदाजात ट्विट केले होते.यावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे
मुंबईकरांची दाणादाण उडवून आता काही वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतली आहे, असं असलं तरीही पावसामुळे ठिकठिकाणी झालेलं नुकसान अजूनही भरून निघालेलं नाही. एकीकडे पाण्याने तुंबलेले रस्ते, रेल्वेच्या ठप्प सेवा यामुळे अगोदरच मुंबईकर त्रासले आहेत, अशातच आता नेते मंडळींच्या असंबद्ध बोलण्याने नागरिकांचा अधिकच संताप होत असल्याचे समजत आहे. याचेच उदाहरण म्हणजे काही वेळापूर्वी शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना संततधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवर शायराना अंदाजात ट्विट केले होते.यावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विट मध्ये , 'कुछ तो चाहत रही होगी, इन बारिश की बूँदों की भी, वर्ना कौन गिरता है इस जमीन पर, आसमान तक पहुँचने के बाद', अशा ओळी लिहिल्या होत्या . त्यावर चिडलेल्या नेटिझन्सनी राऊत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत संतापही व्यक्त केला.
संजय राऊत ट्विट
पहा नेटकऱ्यांचा उपहासात्मक रोष
दरम्यान अशा प्रकारचे वक्तव्य करणारे राऊत हे काही एकमेव नेते नाहीत, काल मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सुद्धा मुंबईत कुठेही पाणी तुंबले नाही असे म्हणत नागरिकांचा रोष स्वतःवर ओढवून घेतला होता. तर आज सकाळी मालाड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर संजय राऊत यांनी पावसाला दोषी ठरवत या मृत्यूंना महापालिका जबाबदार असल्याचे विरोधाकांचे आरोपही खोडून काढले होते.