सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली; शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांचे अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर
शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी अमृता फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली,’ अशा कडवट शब्दांमध्ये त्यांनी अमृता यांचा समाचार घेतला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर रविवारी आपल्या ट्विटर हँडलवरून टीका केली होती. यात त्यांनी खरंय देवेंद्रजी, फक्त 'ठाकरे' आडनाव असून कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं, असं कडवट विधान केलं होतं. यावर शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी अमृता फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली,’ अशा कडवट शब्दांमध्ये त्यांनी अमृता यांचा समाचार घेतला आहे.
इतिहासामध्ये रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचा उल्लेख आहे. पंरतु, सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो! असं अमेय घोले यांनी म्हटलंय. तसचं घोले यांनी या पोस्टमध्ये ‘आजच्या आनंदीबाई’ असा हॅशटॅगही वापरला आहे. त्यांनी अमृता फडणवीस यांना आनंदीबाईंची उपमा दिली आहे. तसेच ठाकरे 'ठाकरे'च, असा हॅशटॅग वापरला आहे. (हेही वाचा - महाविकासआघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका)
इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो! #ठाकरेठाकरेच! #आजच्याआनंदीबाई https://t.co/5GWTWJaCe6
— Amey Ghole (@AmeyGhole) December 22, 2019
अमृता फडणवीस आपल्या ट्विट हँडलवरून नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत असातत. त्यांच्या ट्विटसना अनेकदा प्रतिसाद मिळतो. मात्र, अनेक वेळा त्यांच्या ट्विटरवरून त्यांना ट्रोलही केले जाते. अमृता यांच्या या ट्विटमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यालय या दोन्ही अधिकृत ट्विटर हँडलला मेन्शन केले आहे. त्यामुळे त्यांना शिवसैनिकांकडून ट्रोल केलं जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2019 10:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

